शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
6
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
7
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
8
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
9
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
10
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
11
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
12
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
13
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
14
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
15
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
16
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
17
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
18
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
19
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
20
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
Daily Top 2Weekly Top 5

...मगर जाने का नही; एसटी आंदोलनकर्त्यांचा पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 05:00 IST

विलिनीकरणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी तब्बल ३६  दिवसांनंतरही संपावर ठाम आहेत. संप मोडीत काढण्यासाठी प्रशासनाने नियमित कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि निलंबन तसेच रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती आदी कारवाया सुरू केल्या. कारवाईमुळे संप चिघळण्याचे चित्र आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अल्टिमेटमची मुदत १३ डिसेंबर रोजी संपली. दोन कर्मचाऱ्यांचा अपवाद वगळला, तर इतर संपकरी पुन्हा सेवेत दाखल झाले नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : निलंबित कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी १३ डिसेंबरचा एसटी प्रशासनाचा अल्टिमेटम धुडकावून लावत कर्मचारी संपावर ठाम आहेत. 
विलिनीकरणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी तब्बल ३६  दिवसांनंतरही संपावर ठाम आहेत. संप मोडीत काढण्यासाठी प्रशासनाने नियमित कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि निलंबन तसेच रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती आदी कारवाया सुरू केल्या. कारवाईमुळे संप चिघळण्याचे चित्र आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अल्टिमेटमची मुदत १३ डिसेंबर रोजी संपली. दोन कर्मचाऱ्यांचा अपवाद वगळला, तर इतर संपकरी पुन्हा सेवेत दाखल झाले नाहीत. आतापर्यंत विभागात २,४४४ कर्मचाऱ्यांपैकी ३४६ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. यामध्ये कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा भरणा जास्त आहे. 
दरम्यान,   सोमवार व मंगळवारी अमरावती आगारातून केवळ १२ बस मार्गस्थ झाल्या. त्यामध्ये २४ फेऱ्या लाल परीने केल्या आहेत. संपाचा तिढा सुटणार नाही तोपर्यंत परिस्थिती अशीच राहील, असे बोलले जात आहे.

विलिनीकरणाची प्रमुख मागणी मान्य होत नाही तोपर्यंत कामावर परतणार नाही. कारवाईची तमा आम्ही बाळगणार नाही. आम्ही मागणीवर आजही ठाम आहोत. 
- संजय मालवीय, एसटी कर्मचारी

एसटी कर्मचारी अन्याय सहन करीत आहेत. आता आरपारची लढाई लढत आहोत. कितीही विनंती केली तरी मागणी पूर्ण होईस्तोवर आमचा लढा चालूच राहील.
- सतीश कडू, एसटी कर्मचारी

संपाचा ३६ वा दिवस
एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी विभागातील आठ आगारांतील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपाचा १४ डिसेंबर हा ३६ दिवस आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे संपकरी कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप