शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे पोलिसांना न जुमानता ‘नो पार्किंग झोन’मध्ये वाहने

By admin | Updated: May 20, 2016 00:09 IST

रेल्वे स्थानक परिसरात येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था असतानाही बहुतांश वाहनचालक नो-पार्किंगमध्ये वाहने लावतात.

प्रशासनाची हतबलता : रेल्वे स्थानक परिसरात पुन्हा नियमांचे उल्लंघनअमरावती : रेल्वे स्थानक परिसरात येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था असतानाही बहुतांश वाहनचालक नो-पार्किंगमध्ये वाहने लावतात. नो-पार्किंगमध्ये वाहने लावताना रेल्वे पोलीस वाहनधारकांना हटकतातसुध्दा. मात्र, त्यांनाही न जुमानता वाहनधारक नोपार्किंगमध्ये वाहन लावून रेल्वे स्थानकाच्या आत जातात. हे वास्तव ‘लोकतम’ने केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. त्यामुळे नोपार्किंग वाहने लावणाऱ्याविषयी रेल्वे पोलीस प्रशासन हतबल असल्याचे दिसून येते. मुंबई व पुण्यासारख्या मोठ्या शहरातील रेल्वे स्थानकावर दहशदवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून अनेकदा राज्यभरातील रेल्वे स्थानकांना सतर्कतेच्या सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत. मात्र, अमरावती रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. अमरावतीच्या मॉडेल रेल्वे स्थानकावरून आता अनेक शहरांकडे जाणाऱ्या रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विविध राज्यांतील नागरिक अमरावतीत येतात. त्यामुळे वर्दळ वाढली आहे. अशाप्रसंगी सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना प्रशासनाने करणे आवश्यक आहे. मात्र, रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूने पानटपऱ्या लागल्या आहेत. त्यामुळे नेहमीच तेथे नागरिकांची वर्दळ असते. तसेच आॅटो चालकांची गर्दीसुध्दा वाढली आहे. त्यातच नातेवाईकांना रेल्वेस्थानकावर सोडण्यासाठी येणारे बहुतांश नागरिक दुचाकी पार्किंगमध्ये न लावता नो-पार्किंगमध्येच लावत आहेत. रेल्वे स्थानकात पार्किंगची झोनची व्यवस्था असतानाही बहुतांश नागरिक नो-पार्किंगमध्येच वाहने लावत आहेत. रेल्वे प्रशासनातर्फे तेथे पोलीस तैनात करण्यात आले आहे. मात्र, नो-पार्किंगमधील वाहनांकडे त्यांचे विशेष लक्ष नसल्याचे आढळून येत आहे. दिवसभरात शेकडो वाहने नो-पार्किंगमध्ये लागतात. एखाद्याच वेळी पोलीस अशा वाहनधारकांना हटकताना दिसतात. मात्र, त्यांना न जुमानता वाहनधारक वाहने लावून बिनधास्त रेल्वेच्या आत शिरतात. हा प्रकार रेल्वे स्थानकात दररोज पाहायला मिळत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने नो-पार्किंगसंदर्भात ठोस कारवाई करणे आता आवश्यक झाले आहे. (प्रतिनिधी)