शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

चर्चा नको, आता 'रिझल्ट' हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 05:00 IST

केंद्रातून निधी खेचून आणण्याकरिता माझे प्रयत्न राहील, काहीही काम असेल तर माझ्याशी थेट संपर्क करा. मात्र पुढील बैठकीत अडचणींवर चर्चा होणार नाही, तर 'रिझल्ट' लागेल, अशी तंबी खासदार नवनीत राणा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिली.

ठळक मुद्देनवनीत राणा। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजवा, अपूर्ण कामांचे नियोजन करून ती तातडीने मार्गी लावा, केंद्रातून निधी खेचून आणण्याकरिता माझे प्रयत्न राहील, काहीही काम असेल तर माझ्याशी थेट संपर्क करा. मात्र पुढील बैठकीत अडचणींवर चर्चा होणार नाही, तर 'रिझल्ट' लागेल, अशी तंबी खासदार नवनीत राणा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिली.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या सभागृहात खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील विकासात्मक कामांचा आढावा घेतला. जिल्ह्यात सुरू असलेले केंद्रीय मार्ग निधी, हायब्रीड अ‍ॅन्युईटी, प्रमुख मार्गाची कामे, राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा त्यांनी यावेळी अधिकाºयांकडून माहिती घेतली. शहरातील सुरू झालेली पण प्रलंबित असलेली कामे तातडीने मार्गी लावावे, लोकांना त्रास होता कामा नये, अशी सूचना खासदारांनी केली. ेचिखलदरा-घटांग मार्गावरील काही किलोमीटरचा मार्ग वनविभागाच्या क्षेत्रातून आहे. परंतु हा मार्ग सुरळीत करण्यास वनविभागाची अद्यापही मंजुरी अप्राप्त आहे. याविषयीचा प्रस्ताव द्या, या कामाकरिता पुढाकार घेते, अशी ग्वाही त्यांनी दिली.गाडगेनगर ते शेगाव नाक्यापर्यंतचा प्रस्तावित उड्डाणपूल, भातकुली तालुक्यातील पेढी नदीवर नवीन पुलाचे बांधकाम, बडनेरा रेल्वे उड्डाणपूल, नवाथेजवळील डांबरीकरणाच्या रस्त्याचे काम, जिल्ह्यातील पर्यटन विकास आरखडा व इतर अनेक निधीअंतर्गत प्रस्तावित कामे, तसेच बजेटमध्ये टाकलेल्या कामांचा खासदारांनी आढावा घेतला. बैठकीला कार्यकारी अभियंता सदानंद शेंडगे, दर्यापूरचे अनिल जवंजाळ, एसपीडीच्या कार्यकारी अभियंता विभावरी वैद्य, अचलपूरचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे यांच्यासह उपविभागीय अभियंता उपस्थित होते. तसेच सुनील राणा, आशिष कावरे, नितीन बोरेकर, गिरीश कासट, सचिन भेंडे, विनोद गुहे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास