शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेला २८ लाखांचा चुना

By admin | Updated: July 6, 2014 23:38 IST

शहरातील पथदिवे देखभाल, दुरुस्तीचा कंत्राट येथील मे. ब्राईट इलेक्ट्रॉनिक कंपनीला २४ टक्के वाढीव दराने देण्यात आला आहे. मात्र अटी, शर्थींना बगल देत ब्राईटचा कारभार सुरु असल्याने महापालिकेला

‘ब्राईट’चा प्रताप : पथदिवे देखभाल, दुरुस्ती, कमी वाहने, तोकडे मनुष्यबळअमरावती : शहरातील पथदिवे देखभाल, दुरुस्तीचा कंत्राट येथील मे. ब्राईट इलेक्ट्रॉनिक कंपनीला २४ टक्के वाढीव दराने देण्यात आला आहे. मात्र अटी, शर्थींना बगल देत ब्राईटचा कारभार सुरु असल्याने महापालिकेला वर्र्षाकाठी २८ लाखांचा चुना लागत असल्याचे वास्तव पुढे आले आहे.पाचही झोनमध्ये असलेल्या पथदिवे देखभाल व दुरुस्तीचा कंत्राट जनतेला सोई, सुविधा मिळाव्यात, या अनुषंगाने देण्यात आला आहे. परंतु अधिकाऱ्यांचे कंत्राटदारासोबत लागेबांधे असल्याने बंद पथदिवे सुरु होत नसल्याची ओरड नगरसेवकांची आहे. ‘ब्राईट’च्या गैरकारभाराविषयी पार पडलेल्या स्थायी समितीच्या विशेष बैठकीत सभापती मिलिंद बांबल यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे प्रकाश विभागाची लक्तरे वेशीवर टांगली जाऊ नये, या भीतीपोटी कंत्राटदाराला प्रशासनाने असमाधानकारक कामे होत असल्याचा ठपका ठेवत नोटीस बजावण्यात आली. मात्र कमी वाहने, तोकड्या मनुष्यबळाच्या आधारे कामकाज सुरु असतानाही या गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. ब्राईटकडे महापालिकेचा पथदिवे, देखभाल दुरुस्तीचा कंत्राट असताना अन्य नगरपरिषदेतही कंत्राट असल्याची माहिती आहे. त्यामुळे महापालिकेत कंत्राटातील अटी, शर्तीनुसार ‘ब्राईट’ वेळेवर कामे करीत नसल्याचे चित्र आहे. नगरसेवकांनी पाठपुरावा करुनही सुचवलेली कामे वेळेपूर्वी होत नसल्याने प्रत्येक आमसभेत ‘ब्राईट’च्या गलथान कारभाराविरोधात सदस्यांचे प्रस्ताव राहतात, हे विशेष. पथदिवे देखभाल, दुरुस्तीसाठी आवश्यक असलेली १८ वाहने आणि त्याकरिता लागणारे मनुष्यबळ दैनंदिन राहते काय? याचे लेखापरीक्षण मॅनेज करण्यात आले आहे. संपूर्ण शहराचा एकच कंत्राट देण्यामागे ‘ब्राईट’ने यवतमाळ येथून सूत्रे हलवून मोहीम फत्ते केल्याची माहिती आहे. त्याकरिता संबंधित अधिकाऱ्याला साडेचार एकर शेत खरेदी करुन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. कमी वाहने आणि तोकडा मनुष्यबळाच्या आधारे कामकाज सुरु असल्याने २४ टक्के वाढीव कंत्राटानुसार दरवर्षी महापालिकेला २८ लाखांचा फटका बसत आहे.