शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
4
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
5
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
6
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
7
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
9
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
10
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
11
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
12
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
13
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
14
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
15
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
16
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
17
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
18
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
19
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
20
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
Daily Top 2Weekly Top 5

नेरपिंगळाईत १०४८ वर्षे पुरातन गणपती

By admin | Updated: September 25, 2015 23:59 IST

येथील गुरु गंगाधार स्वामी वीरशैव मठात शके ८८५ इ.स. ९६३ पासून गणेशोत्सव साजरा केला जातो.

भाविकांची गर्दी : गंगाधर स्वामी मठाची परंपरा, दगडधोंड्यातून भाविक घेतात लोटांगणश्रीकृष्ण मालपे नेरपिंगळाईयेथील गुरु गंगाधार स्वामी वीरशैव मठात शके ८८५ इ.स. ९६३ पासून गणेशोत्सव साजरा केला जातो. काही भाविक विसर्जनस्थळापासून मठापर्यंत म्हणजे दीड कि.मी. अंतर दगडधोंड्यातून लोटांगण घालीत कापतात. ही एक दैवी अनुभूती मानली जाते.नेरपिंगळाई येथील श्रीगुरु गंगाधर स्वामी मठाची स्थापनेची नोंद मठाच्या प्रवेशद्वारावर आजही अंकित आहे. १२व्या शतकातील कल्याणमधील क्रांतीनंतर सर्व शरण देशाच्या अन्य भागात विखुरले गेले. शरणाई आपले बाल बस्त यास घेऊन येथे राहत असताना बाल बस्त अचानक बेपत्ता झाला. शरणाई चिंतीत झाल्या. तो परत यावा म्हणून त्यांनी गणेशाची आराधना व नवस बोलला आणि चमत्कार म्हणजे बाल बस्त धावत येऊन शरणाईला बिलगले. तो दिवस होता भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीचा आपल्याला जणू गणेश मिळाला, या आनंदात त्यांनी येथे गणेशाची स्थापना केली. तेव्हापासून येथे गणेशोत्सव साजरा केला जातो. ज्या ठिकाणी शरणाईने श्री गणेशाची स्थापना केली होती त्याच जागेवर आजही ही विधिवत माती ठेवण्यात येते व या मातीवर धार्मिक काशीखंड या ग्रंथाचे संस्कार केले जाते. त्यानंतर ही मुर्ती अमरावतीचे मुर्तिकार आजने यांच्याकडे पोहोचवून मूर्ती घडविण्यात येते. ही मुर्ती सहा ते सात फूट उंचीची व स्वरुप परंपरागत असते. १०४८ वर्षाची पंरपरा येथील मठाच्या गणेशोत्सवाला लाभली आहे. मठाव्यतिरिक्त गावात पन्नासच्यावर सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. गावाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत अग्रभागी मठाचा गणपती असतो. त्यामागे इतर मंडळ व घरगुती गणेशमुर्ती राहतात. विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी मुस्लीम भागात मुस्लीम बांधव पिण्याच्या पाण्याची सोय करतात. मिरवणुकीत द्यिंा, ढोल-ताशे, भजनी मंडळी व सार्वजनिक देखावे सहभागी असतात. विसर्जनानंतर काही भाविकस श्रीगुरु गंगाधर स्वामींच्या नावाने लोटांगण घालतात. विसर्जन स्थळापासुन ते मठापर्यंत दगड-धोंड्यातून हे लोटांगण घातले जाते. भाविकांना मठातील विहिरीच्या पाण्याने, आंधोळ घातली जाते व मठाधिपती त्यांना प्रसाद देतात. या लोटांगण दरम्यान कोणतीही इजा होत नाही. असे भाविक मानतात.