शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांवर नऊ पंचायत समितींंची धुरा

By admin | Updated: June 5, 2015 00:33 IST

जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग गुणवत्ता वाढविण्यासाठी कितीही प्रयत्न करीत असला तरी सद्यस्थितीत जिल्ह्यातील १४ पैकी तब्बल ९ पंचायत समितीत ...

अमरावती : जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग गुणवत्ता वाढविण्यासाठी कितीही प्रयत्न करीत असला तरी सद्यस्थितीत जिल्ह्यातील १४ पैकी तब्बल ९ पंचायत समितीत गटशिक्षणाधिकाऱ्यांचा कार्यभार प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू आहे. केवळ पाच पंचायत समितींचा अपवाद वगळता ही स्थिती असतानाच जून, जुलै महिन्यात या पाचपैकी चार नियमित गटशिक्षणाधिकारी सेवानिवृत्त होत असल्याने संपूर्ण जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागच प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांवर चालणार आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाचा शिक्षण विभाग व जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा गुणवत्ता वाढीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना या रिक्त पदांमुळे कितपत यश येते हा या रिक्त पदांमुळे संशोधनाचा विषय ठरत आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या कार्यक्षेत्रात १४ पंचायत समितीमधील गटशिक्षणाधिकारी यांची पदे महत्त्वपूर्ण आहेत. या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा डोलारा सांभाळला जातो. जिल्ह्यातील आदिवासीबहुल मेळघाटसह इतर तालुक्यांत जिल्हा परीक्षण शिक्षण विभागामार्फत सुमारे १ हजार ६०२ शाळा आहेत. या शाळेत शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा ढासळलेला शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता वाढीसाठी केले जाणारे प्रयत्न यशस्वी करण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शिक्षण विभागातील रिक्त पदे त्वरित भरणे आवश्यक आहे. त्याशिवाय चित्र पालटू शकत नाही. (प्रतिनिधी)शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या नऊ पंचायत समितींमधील गटशिक्षणाधिकाऱ्यांची रिक्त असलेली पदे त्वरित भरण्याबाबतचा अहवाल राज्याच्या संबंधित विभागातील प्रधान सचिवाकडे पाठविण्यात आला आहे. ही पदे शक्य तेवढ्या लवकर भरण्याबाबतचा आपला प्रयत्न सुरू आहे. यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे.- अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती.