शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
7
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
8
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
9
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
10
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
11
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
12
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
13
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
14
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
15
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
16
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
17
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
18
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
19
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
20
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने नऊ बकऱ्या दगावल्या

By admin | Updated: June 24, 2015 00:43 IST

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार परत एकदा चव्हाट्यावर आला.

तिवसा येथील घटना : वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावरतिवसा : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार परत एकदा चव्हाट्यावर आला. बकऱ्यांचा कळप चराई करण्याकरिता गेलेल्या ९ बकऱ्यांचा जमिनीवर पडलेल्या जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ९.३० वाजता तिवसा येथील टोल नाक्यानजीक शेतशिवारात घडली. दीपक एकनाथ सावंत (२५ रा. तिवसा) हा गुराखी आपल्या मालकीच्या बकऱ्या चराई करण्याकरिता घेऊन गेला होता. त्यापैकी दोन बकऱ्या फुलाबाई सावंत या महिलेच्या होत्या. सदर बकऱ्यांचा कळप अमरावती-नागपूर महामार्गावरील मुख्य तिवसा टोल नाक्यानजीक डाव्या बाजूला एका शेतात गेल्या असता तेथे जिवंत वीज तारा जमिनीवर पडल्या होत्या. या विद्युत तारेला नऊ बकऱ्यांचा स्पर्श होताच त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये सुदैवाने गुराखी मालक दीपक सावंत याचा जीव थोडक्यात बचावला. बकऱ्यांचा मृत्यू झाल्याने सावंत याचे ५० हजारांचे नुकसान झाले असून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे सदर घटना घडली असल्याने नुकसानग्रस्त गुराखी दीपक सावंत याने तिवसा पोलीस ठाण्यात वीज वितरण कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल आहे. मंगळवारी भरदिवसा उघड्यावर जिवंत वीज तारा पडल्यामुळे बकऱ्यांचा मृत्यू झाल्याने सावंत यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गुराखी दीपक सावंत याने तक्रारीत केली आहे. (प्रतिनिधी)