शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

तलावातील गाळ काढण्याच्या कामाला कंत्राटदाराकडून बगल

By admin | Updated: May 25, 2016 00:44 IST

टंचाईग्रसत तारुबांदा या गावातील एकमेव तलावाचे गाळ काढून खोलीकरणाचे काम प्रस्तावित असताना कंत्राटदाराने

टंचाईग्रस्त तारुबांदा : व्याघ्र जंगलात खोदकामधारणी : टंचाईग्रसत तारुबांदा या गावातील एकमेव तलावाचे गाळ काढून खोलीकरणाचे काम प्रस्तावित असताना कंत्राटदाराने लगतच्या व्याघ्र प्रकल्पातील जंगालतून मुरूम खोदण्याचे अफालतून प्रकार सुरू केल्याने मूळ उद्देशाला बगल देण्यात आले आहे. त्यामुळे या कामावर होणारे २५ कोटी रुपयांचे खर्च पाण्यात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. धारणीपासून ४० किमी अंतरावरील चिखलदरा तालुक्यातील तारुबांदा हे गाव आहे. या गावात उन्हाळ्यात दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होत असल्याने ४ महिने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. यावर्षीसुद्धा टँकरद्वारे एकमात्र विहिरीत पाणी सोडण्यात येत असून नंतर दोरीने पाणी काढण्याचे प्रकार सुरू आहे. त्यामुळे एकाच विहिरीवर संपूर्ण गावाची तहान भागविली जात आहे. या नेहमीच्या त्रासापासून मुक्ती मिळावी म्हणून विहिरीच्या दक्षिणेला असलेल्या तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय जि.प.सदस्य महेंद्र सिंह गैलवार यांनी घेतला. त्यांनी महात्मा फुले योजनेत या तलावाचे खोलीकरण व गाळ उपसण्याचे कामाला मंजुरी मिळवून दिली. त्यानुसार कामाची निविदाही काढण्यात आली. कंत्राटदाराने प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली. मात्र गाळ उपसण्याचे सोडून लगतच्या भूभागातून मुरूम खोदण्याचे काम सुरू केले. या प्रकाराला तारुबांदा व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सौदागर यांनी त्वरित बंदी आणली व कामात होत असलेला गैरप्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही न जुमानता जेसीबीच्या सहाय्याने मुरूम खोदण्याचे काम सुरूच होते. याचे सविस्तर वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित केले होते. गावकऱ्यांनीसुद्धा गाळ काढण्याचा आग्रह धरला. गाळ काढण्यात जास्त परिश्रम लागत असल्याने कंत्राटदाराने कामच बंद केल्याचे आज प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली असता निदर्शनास आले आहे. गाव तलावातील प्राणी उपासण्याचे काम गावकऱ्यांनी स्वत:कडील ५-६ आॅईल इंजीन लावून केले. मात्र गाळ काढण्याचे वेळी कंत्राटदाराने काम बंद करुन दिले. याबाबत गावकऱ्यांनी संवाद साधला असता कंत्राटदाराकडून डिझेल संपले, जेसीबी खराब झाले, असे उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. त्यामुळे तारुबांदा गावकऱ्यांची पाण्याची समस्या कायमस्वरुपी दूर होण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची आशा मावळली आहे. (तालुका प्रतिनिधी) गावतलाव हे तारुबांदाची तहान व इतर गरजा मागविण्याचे महत्त्वाचे स्त्रोत्र आहे. या तलावातील गाळ काढून खोलीकरण झाल्यास येथील पाणी समस्या नेहमीसाठी दूर होईल. यासाठी गावकऱ्यांना कामाचे नियोजन निविदेप्रमाणे व अंदापत्रकानुसार करण्याची सूचना दिली आहे.- सौदागर, वन परिक्षेत्र अधिकारी, तारुबांदातारुबांदा हे गाव माझे मतदारसंघ चिखलीत येते. या गावताील पाण्याची समस्या कायमस्वरुपी दूर व्हावी, या हेतुने तलावाचे खोलीकरण करण्याचे कामाला मंजुरात आणून दिली. मात्र कंत्राटदाराच्या मनमानीमुळे गाळ उपसण्याचे काम बंद पडले आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.- महेंद्रसिंह गैलवार, जि.प.सदस्य, चिखली सर्कल