शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

नव्या निर्णयाला पक्षाचे बंधने नाहीत

By admin | Updated: August 23, 2014 01:20 IST

सदस्यांनी महिन्याभराच्या आत नोंदणी केली नाही तर संबंधित सदस्याचे पद खारीज केले जाते, ...

अमरावती : सदस्यांनी महिन्याभराच्या आत नोंदणी केली नाही तर संबंधित सदस्याचे पद खारीज केले जाते, असे नव्या नियमात नमूद आहे. त्यानुसार महापालिकेत २३ सदस्यांनी एकत्रित येऊन राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंट या नावाने आघाडी स्थापन केली. सर्व सदस्यांचे स्वतंत्र प्रतिज्ञापत्र घेऊन गट स्थापन करताना या गटाचे गटनेते म्हणून अविनाश मार्डीकर यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली. हा फ्रंट निवडणुकीनंतर तयार करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी या नावाचा वापर होत असल्याचा नियम लागू होत नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे गटनेता बदलविण्याचा निर्णय पक्षाने घेतला. अविनाश मार्डीकर यांच्या जागी सुनील काळे यांची गटनेतेपदी वर्णी लावण्यात आली. गटातील कोणत्याही सदस्यांची मागणी नसताना मार्डीकर यांना गटनेतेपदावरुन हटविण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनेत्यांनी गटनेते पदाचे अधिकार सुनील काळे यांना असल्याचे अधिकृत पत्र काढले. हेच पत्र विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आले. आयुक्तांनी अविनाश मार्डीकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. ही कारवाई स्थानिक स्वराज्य संस्था अपात्र नियमात बसत नसतानाही विभागीय आयुक्तांनी हा निर्णय राजकीय दबावाखाली घेतला होता, असा आरोप खोडके यांनी केला. याबाबत मार्डीकर यांची उच्च न्यायालयात याचिका सादर करताना हे प्रकरण ‘केस लॉ’ प्रमाणे हाताळण्यासाठी प्रदीप महल्ले, अशोक जैन, जी.एम. भांगडे,किशोर शेळके यांनी सहकार्य केले. एकदा गट स्थापन झाल्यानंतर गटनेता बदलविण्याचे अधिकार पक्षाला नसून गटातील दोन तृतीयांश सदस्यांनी मागणी केली तरच गटनेता बदलण्याचे अधिकार आयुक्तांना नव्या कायद्यानुसार असल्याचे खोडके यांनी सांगितले. मार्डीकर यांच्यावर निलंबनाची कारवाई सत्तेच्या दबावाखाली विभागीय आयुक्तांनी घेतली असली तरी न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याने निकाल आपल्याच बाजूने लागेल, अशी आशा होती. तो विश्वास उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या निकाल्याने सार्थकी लागल्याचे मत खोडके यांनी व्यक्त केले. मात्र विभागीय आयुक्तांना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या न्याय निर्वाळ्याचे बहाल करण्यात आलेले अधिकार राजकीय दबावाखाली दिली जात असेल तर ते अधिकार काढून टाकावे, अन्यथा सदस्य ज्या भावनेने निवडणुकीला सामोरे जातो, त्याचे जीवन संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही, अशी मागणी त्यांनी केली.यावेळी वऱ्हाड विकास मंचच्या संस्थापक सुलभा खोडके, प्रदीप महल्ले, अशोक जैन, अविनाश मार्डीकर, किशोर शेळके, सुनील बोळे, चेतन पवार, संजय आसोले, हमीद शद्दा, जावेद मेमन, रिना नंदा, ममता आवारे, वंदना हरणे, सारिका महल्ले आदी उपस्थित होते.