शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
2
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
3
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
4
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
5
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
6
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
7
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
8
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
9
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
10
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
11
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
12
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
13
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
14
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
15
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
16
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
17
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
18
तामिळनाडूत मोठ्ठा 'खेला', ११८ साठी झगडणाऱ्या विजय यांना बहुमत चाचणीत १४४ आमदारांचा पाठिंबा! काय घडलं?
19
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
Daily Top 2Weekly Top 5

डफरीनमध्ये २00 बेडसह नवीन इमारत

By admin | Updated: May 22, 2014 00:46 IST

जिल्हा स्त्री रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढल्याने एकाच कॉटवर दोन-दोन प्रसूत

अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढल्याने एकाच कॉटवर दोन-दोन प्रसूत महिलांना ठेवण्यात येत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच जिल्हा प्रशासनाने २00 अतिरिक्त कॉटची व्यवस्था करण्याकरिता हालचाली सुरु केल्या आहेत. बुधवारी दुपारी सार्वजनिक बाधंकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी डफरीन परिसराचे सर्व्हेक्षण करुन इमारतीच्या बांधकामाची रूपरेषा ठरविली

जिल्हा

स्त्री रुग्णालयात रुग्णांची वाढती संख्या पाहता इमारतीचा विस्तार करण्याची गरज भासू लागली आहे. त्यासाठी नवीन इमारतीचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. ३५0 बेडची व्यवस्था असणार्‍या नवीन इमारतीला शासनाकडून मंजुरीही मिळाली होती. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून ही बांधकाम प्रक्रिया रखडली आहे. त्यानंतर प्राप्त निधीतून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १ व २ मध्ये सुधारणा करण्यात आली. मात्र, रूग्णांकरिता अतिरीक्त बेडसहित नवीन इमारतीचे काम रखडलेलेच आहे. ‘लोकमत’ने रुग्णालयातील ही वस्तुस्थिती मांडल्यामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. रूग्णालयाच्या आवारातील उद्यान व पाणपोई हटवून त्या जागी आता रूग्णांच्या सोयीकरिता इमारत बांधण्यात येणार आहे. बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता मंडपे व कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील यांनी रुग्णालय परिसराची पाहणी केली. यावेळी इमारत बांधकामाची रुपरेषा ठरविली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक अरुण यादव उपस्थित होते. कोट्यवधी रूपये खर्च करुन ही इमारत लवकरच तयार होण्याचे संकेत आहेत. (प्रतिनिधी)