शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

फोनवरून बोलण्यासाठी करावी लागते ‘वीरुगिरी’

By admin | Updated: September 26, 2015 00:01 IST

डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत मेळघाटातील एक गाव जागतिक पातळीवर लवकरच झळकणार आहे. दुसरीकडे आप्तस्वकीयांसोबत संवाद साधण्यासाठी नागरिकांनी...

योजनेचा बट्ट्याबोळ : दूरसंचार विभाग कुंभकर्णी झोपेतनरेंद्र जावरे चिखलदराडिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत मेळघाटातील एक गाव जागतिक पातळीवर लवकरच झळकणार आहे. दुसरीकडे आप्तस्वकीयांसोबत संवाद साधण्यासाठी नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर चढून संवाद साधावा लागत असल्याचे दुर्दैवी चित्र तालुक्याच्या काटकुंभ येथील आहे. येथील बीएसएनएलचे टॉवर महिनाभरापासून चालू-बंद होत आहे.तालुक्यातील काटकुंभ येथे भारत संचार विभागाचे मोबाईल टॉवर आहे. यामुळे परिसरातील ५२ गावांपैकी किमान ८ ते १० गावांत मोबाईल नेटवर्क होते. परंतु महिनाभरापासून बीएसएनएलची सेवा कोलमडली आहे. लाखो रूपयांचे टॉवर निकामी झाल्याने ते पांढरा हत्ती ठरले आहे. या टॉवरकरिता आवश्यक यंत्रसामग्री कालबाह्य झाल्याने ते बंद पडून आहे. यासंदर्भात युवक काँग्रेसचे महासचिव राहुल येवले, पीयूष मालवीय, गौरव काळे, अमोल बोरेकार आदी पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनसुद्धा दिले. मात्र त्यावर एक महिन्याचा कालावधी लोटत असून कुठल्याच प्रकारची कार्यवाही संबंधित विभागाने केली नाही. परिणामी परिसरातील आदिवासींमध्ये शोभेची वास्तू ठरलेल्या टॉवरविरुद्ध संताप खदखदत आहे. पोटासाठी आवश्यक झाला मोबाईलजीवनावश्यक वस्तूप्रमाणेच दररोजच्या जीवनात मोबाईल आवश्यक झाला असताना मेळघाटातील आदिवासींच्या पोटासाठी अनिवार्य झाल्याचे स्पष्ट होत आहे. पोटासाठी स्थलांतरित होणाऱ्या आदिवासींच्या हाताला मेळघाटात काम नसल्याने ते दुसऱ्या शहरात पाठीवर बिऱ्हाड घेऊन निघतात, आवश्यक कामाच्या ठिकाणी जावे लागण्यासाठी त्यांनी संबंधित मजुरांच्या दलालास आपला मोबाईल क्रमांक दिला आहे. परंतु काटकुंभ येथील सेवा ७ महिन्यांपासून बंद असल्याने त्यांच्या पोटाचा प्रश्न या बंद टॉवरमुळे ऐरणीवर आला आहे. रोजंदारीच्या कामासह इतर आवश्यक संवाद आप्तस्वकियांसोबत साधणे बंद झाले आहे. टॉवरवर चढून वीरूगिरीकाटकुंभ येथील मुख्य चौकात पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. ७ महिन्यांपासून बीएसएनएल सेवा बंद असल्याने नागरिकांना या टाकीच्या पाऱ्यांवर चढून संवाद साधावा लागत आहे. लगतच्या भैसदेही, बैतूल (मध्य प्रदेश) चे नेटवर्क येथे लागते, तर कुठे उंच टेकडीवर चढावे लागते. त्यानंतर संवाद साधला जातो. यात मात्र पलिकडून फोन आल्यास रोमिंगचा अतिरिक्त भार सहन करावा लागतो. त्यापेक्षा स्वत:च बोलणे पसंद करतात. पाण्याची टाकी संवाद साधण्याचे केंद्र ठरले आहे.