शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात वनौषधी निर्मिती प्रकल्पाची गरज

By admin | Updated: November 4, 2014 22:33 IST

मेळघाटात वनौषधींचा मोठ्या प्रमाणावर ठेवा आहे. महाराष्ट्रात १५० कुळांचे वनौषधी आहेत. यातील ९७ कूळ वनौषधी एकट्या मेळघाटात असल्याच्या नोंदी आहेत. मात्र या बहुमूल्य वनौषधीला तस्करांनी आपले

श्यामकांत पाण्डेय - धारणीमेळघाटात वनौषधींचा मोठ्या प्रमाणावर ठेवा आहे. महाराष्ट्रात १५० कुळांचे वनौषधी आहेत. यातील ९७ कूळ वनौषधी एकट्या मेळघाटात असल्याच्या नोंदी आहेत. मात्र या बहुमूल्य वनौषधीला तस्करांनी आपले लक्ष्य केले आहे. यामुळे वनौषधी लोप पावण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळेच तस्करीवर प्रतिबंध घालून मेळघाटात वनौषधी निर्मिती प्रकल्प उभारण्याची गरज आहे. मेळघाटातील दुर्मीळ, अतीदुर्मीळ आणि सामान्य वनौषधींसंदर्भात अनेकांनी येथे येऊन अध्ययन केले आणि ही संपूर्ण माहिती पुस्तक स्वरुपात तयार केली. सर्वप्रथम कॅप्टन वीट यांनी मेळघाटातील वनौषधीबाबत अभ्यास करुन पुस्तक स्वरुपात ही माहिती जतन केली आहे. १९३५ मध्ये पटेल यांनी येथील वनौषधी संदर्भातील पुस्तक तयार केले, तर १९८८ साली बाबासाहेब ढोरे यांनी मेळघाटचा अभ्यास करुन ही माहिती साठवून ठेवली. या अभ्यासकांनी केलेले संशोधन व लिखाणावरुन मेळघाटातील वनौषधींबाबतचे महत्त्व विशद होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात दुर्मीळ वनौषधी मेळघाटात असताना त्याचे जनत करण्यासाठी शासनाकडून कोणतेही प्रयत्न केले गेले नाही. येथे व्याघ्र प्रकल्पाची स्थापना करुन बहुमूल्य वनौषधीला दुय्यम स्थान देण्यात आले. यातच वनविभागाच्या दुर्लक्षामुळे वाघ व इतर वन्यप्राण्यांच्या शिकारीसह वनौषधी तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मेळघाटात आढळणाऱ्या वनौषधींमध्ये ३९८ जाती व ७१५ प्रजातींचा समावेश आहे. यात वृक्ष वर्गीय, झुडुपी वर्गीय व कंद वर्गीय वनौषधींचा समावेश आहे.