नांदगाव खंडेश्वर तालुका ग्रामपंचायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:14 IST2021-01-20T04:14:26+5:302021-01-20T04:14:26+5:30

मंगरूळ चव्हाळामध्ये काँग्रेस-सेना पॅनेल नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा या ११ सदस्यीय मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस व सेना युतीच्या ...

Nandgaon Khandeshwar Taluka Gram Panchayat | नांदगाव खंडेश्वर तालुका ग्रामपंचायत

नांदगाव खंडेश्वर तालुका ग्रामपंचायत

मंगरूळ चव्हाळामध्ये काँग्रेस-सेना पॅनेल

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा या ११ सदस्यीय मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस व सेना युतीच्या पॅनेलने तब्बल १० जागा पटकाविल्या. येथे महाआघाडीला निर्भेळ यश मिळाले. यात काँग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी पाच जागा मिळाल्या. भाजपप्रणीत पॅनेलला मात्र एकाच जागेवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत निखिल देशमुख, लक्ष्मी खांडेकर, नीलेश निंबरते, अश्विनी चवाळे, अतुल ठाकूर, शोभा चवाळे, रेश्मा शिरभाते, रामदास कोचडे, राजेश पारधी, सविता झोपटे व सुनीता टेवरे हे उमेदवार विजयी झाले. शिवसेनेचे बाळासाहेब राणे, विनोद पिंपळकर, नंदकिशोर राणे तसेच काँग्रेसचे मोरेश्वर शिरभाते, अतुल ठाकूर, अब्दुल सलाम व गजानन काकडे यांच्या मार्गदर्शनात या पॅनलने विजय संपादन केला.

----------------------

लोणी येथे महाआघाडी

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस व शिवसेना महाआघाडीच्या पॅनेलने ११ पैकी सहा जागा पटकावल्या. शिवसेनेचे बाळासाहेब भागवत व काँग्रेसचे प्रवीण सवाई यांच्या नेतृत्वात हे पॅनल लढवले गेले. भाजपला पाच जागा मिळाल्या. या निवडणुकीत मंगला शेवतकर, सूरज औतकर, रोशनी खडसे, नीलेश लोहकरे, विनय बोबडे, प्रतीक्षा आखरे तसेच वैष्णवी तिखिले, रोशन मुंदाने, दीपक तिखिले, प्रीती लोहकरे, अब्दुल अमिनाबी हे उमेदवार विजयी झाले.

---------------------------

Web Title: Nandgaon Khandeshwar Taluka Gram Panchayat