‘त्या’ चिमुकल्याच्या हत्येचे गूढ उलगडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:33 IST2020-12-04T04:33:43+5:302020-12-04T04:33:43+5:30

अमरावती : अपहरण झाल्यानंतर सोमवारी सकाळी दीड महिन्याच्या चिमुकल्याचा मृतदेह अंगणातील विहिरीत आढळून आला होता. तीन दिवस झाल्यानंतरही या ...

The mystery of Chimukalya's murder has not been solved | ‘त्या’ चिमुकल्याच्या हत्येचे गूढ उलगडेना

‘त्या’ चिमुकल्याच्या हत्येचे गूढ उलगडेना

अमरावती : अपहरण झाल्यानंतर सोमवारी सकाळी दीड महिन्याच्या चिमुकल्याचा मृतदेह अंगणातील विहिरीत आढळून आला होता. तीन दिवस झाल्यानंतरही या चिमुकल्याच्या हत्येचे गूढ उलगडले नाही.

राजापेठ पोलिसांनी याप्रकरणी बुधवारी सकाळी चौहान कुटुंबाच्या मोलकरणीचे बयाण नोंदविले. मृताचे आजी- आजोबा घरी असतानाच सदर मोलकरीण भांडे घासण्याकरिता आली होती. त्यांच्या उपस्थितीतच ती कामे करून निघून गेली. त्यानंतर काही वेळाने ही घटना घडल्याचे तिने पोलिसांना बयाणात सांगितले. मंगळवारी मृताची आई नम्रता यांचे बयाण पोलिसांनी नोंदविली होते. आतापर्यंत याप्रकरणी सात जणांचे बयाण नोंदविले गेले. मात्र, चिमुकल्याला नेमके कुणी विहिरीत टाकले व का, याचे गूढ पोलिसांना उलगडता आले नाही. ते अंतिम निष्कर्षाप्रत अद्याप पोहोचू शकले नाहीत. हे प्रकरण संवेदनशील असल्याने पोलीस तपास काळजीपूर्वक हाताळत आहेत. लवकरच या प्रकरणाची चौकशी पूर्ण करून आरोपीला अटक करण्यात येईल, असे पोेलिसानी स्पष्ट केले.

Web Title: The mystery of Chimukalya's murder has not been solved