शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सबलीने वार करून इसमाची हत्या

By admin | Updated: January 14, 2017 00:11 IST

गावातील व्यक्तिच्या अंत्यसंस्कारासाठी गाव स्मशानभूमित गोळा झाला असताना गावकऱ्यांसमक्षच सबलीने डोक्यात वार करून ४० वर्षीय इसमाला ठार केल्याची घटना ...

धामणगाव काटपूर येथील घटना : स्मशानभूमित गावकऱ्यांसमक्षच थरार लेहगाव : गावातील व्यक्तिच्या अंत्यसंस्कारासाठी गाव स्मशानभूमित गोळा झाला असताना गावकऱ्यांसमक्षच सबलीने डोक्यात वार करून ४० वर्षीय इसमाला ठार केल्याची घटना गुरूवारी नजीकच्या धामणगाव काटपूर येथे घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या इसमाचा नागपूर येथे उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला. अनैतिक संबंधाच्या संशयातून ही घटना घडल्याची प्राथमिक शक्यता पोेलिसांनी वर्तविली आहे. दिलीप देवीदास निमकर्डे (४०, रा. धामणगाव काटपूर) असे मृताचे तर सबलीने वार करून ठार मारणाऱ्या आरोपीचे नाव संदीप मुकुंद तायडे, असे आहे. विस्तृत माहितीनुसार, गावातील गरिब्या ऊर्फ देवीदास अढाईके नामक वृद्धाचा मृत्यू झाल्याने त्याची अंत्ययात्रा गावातील स्मशानभूमित गेली होती. अंत्यसंस्कारासाठी खड्डा खोदण्याचे काम संदीप मुकुंद तायडे हा करीत होता. अंत्ययात्रेत १०० ते १५० गावकरी सहभागी झाले होते. त्यातच दिलीप देवीदास निमकर्डे हेदेखील उपस्थित होते. खड्डा खोदत असतानाच आकस्मिकपणे आरोपी संदीप तायडे याने खड्डा खोदण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सबलीने दिलीप निमकर्डे याच्या डोक्यावर मागून वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. नातलगांनी तातडीने त्यांना आधी जिल्हा सामान्य रूग्णालयात व प्रकृती गंभीर असल्याने नागपूरच्या रूग्णालयात हलविले. मात्र शुक्रवारी उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मात्र, आरोपी तेथून पसार झाला होता. त्याने गुरूवारी सायंकाळी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. पोलिसांनी याप्रकरणी भादंविच्या कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणाचा तपास शिरखेड पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन चव्हाण, बीट जमादार घोम यांच्या मार्गदर्र्शनात सुरू आहे. (वार्ताहर)