शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
3
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
4
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
5
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
6
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
7
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
8
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
9
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
10
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
11
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
12
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
13
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
14
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
15
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
16
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
17
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
18
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
19
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
20
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
Daily Top 2Weekly Top 5

अचलपुरात सर्वाधिक दुष्काळग्रस्त गावे

By admin | Updated: December 6, 2014 22:38 IST

जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरातील १९८१ गावांपैकी १९८६ गावांमध्ये टंचाई जाहीर केली आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यातील सर्वाधिक १८४ गावांचा तर सर्वात कमी टंचाईची ९० गावे चांदूर रेल्वे तालुक्यातील आहेत.

अमरावती : जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरातील १९८१ गावांपैकी १९८६ गावांमध्ये टंचाई जाहीर केली आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यातील सर्वाधिक १८४ गावांचा तर सर्वात कमी टंचाईची ९० गावे चांदूर रेल्वे तालुक्यातील आहेत.
जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जिल्ह्यातील एकूण १९८१ महसुली गावांत टंचाई जाहीर केली आहे. राज्य शासनाच्या २५ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासननिर्णयानुसार सन २०१४-२०१५ यावर्षातील खरीप हंगामातील ज्या गावांची नावे टंचाई म्हणून जाहीर केली आहे त्या गावांमध्ये ५० पैशाच्या आत आणेवारी असल्यामुळे टंचाईची घोषणा करून या गावामध्ये दुष्काळी स्थितीत आवश्यक उपायोजनासुध्दा जाहीर केल्या आहेत.
टंचाईग्रस्त तालुकानिहाय गावांच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक टंचाईची गावे अचलपूर तालुक्यात १८४ तर सर्वात कमी गावे ९० चांदूररेल्वे तालुक्यातील आहेत. त्यापाठोपाठ चांदूरबाजार तालुक्यातील १७१, चिखलदरा तालुक्यातील १६३, नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील १६१, मोर्शी १५६, धारणी १५२, दर्यापूर १५०, अमरावती १४३, वरूड १४०, भातकुली १३७,अंजनगाव सुर्जी १२७, धामणगाव रेल्वे ११२, तिवसा ९५ व चांदूररेल्वेत ९० अशा सुमारे १९८६ गावांमध्ये टंचाई जाहीर केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली ही गावे क्रमवारीनुसार पाहिल्यास गावांची संख्यानिहाय क्रम असा लागतो. विशेष म्हणजे अमरावती तालुक्यातील तुळजापूर, गावातील जमिन औद्योगिक वसाहतीत गेली आहे. चांदूररेल्वे तालुक्यातील सावंगा येथील शेती शंभर टक्के बुडीत क्षेत्रात गेली आहे. वरूडमधील चांदूरवाडी आणि धारणी तालुक्यातील दुधाणी आदी गावात महसुल विभागाची जमिन नसल्याने ही चार गावे टंचाईमधून वगळण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)