शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शीत अल्पशिक्षित, सुशिक्षितही मैदानात

By admin | Updated: October 3, 2014 01:04 IST

विधानसभा निवडणुकीत उभे राहण्याकरिता उमेदवारांना शैक्षणिक अर्हतेची अट घातली नसल्यामुळे इयत्ता सातवीपासून ....

रोहितप्रसाद तिवारी  मोर्शीविधानसभा निवडणुकीत उभे राहण्याकरिता उमेदवारांना शैक्षणिक अर्हतेची अट घातली नसल्यामुळे इयत्ता सातवीपासून चक्क वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवीप्राप्त उमेदवार विधानसभेच्या निवडणूक रिंगणात आहेत. मतदार उच्च विद्याविभूषीत उमेदवाराला पसंती देतात की, अल्पशिक्षित उमेदवाराला निवडतात, हे निवडणूक निकालानंतरच कळणार आहे. मोर्शी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता एकूण २८ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. एका उमेदवारांचे नामांकन रद्दबातल करण्यात आले. तर ८ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे आता १९ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत.इयत्ता ७ ते १० वी अनुत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची संख्या दोन आहे. त्यात सुमित्रा गायकवाड (अपक्ष) या इयत्ता ७ वी उत्तीर्ण आहेत, तर नरेशचंद्र ठाकरे (काँग्रेस) हे इयत्ता ८ वी उत्तीर्ण आहेत. इयत्ता १० वी ते १२ वी अनुत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता धारण करणारे ३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात विनायक वाघमारे (हिंदुस्थान जनता पार्टी) १२ वी नापास, अरुण चव्हाण (भारिप बहुजन महासंघ) आणि चंद्रकांत कुमरे (अपक्ष) हे दोन्ही उमेदवार १० वी उत्तीर्ण आहेत. १२ वी उत्तीर्ण ते पदवी परीक्षा अनुत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता धारण करणारे ५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात संजय देशमुख (मनसे) बी.ए प्रथम वर्ष, कैलास वानखडे (भारतीय दलित काँग्रेस) बी.ए. व्दितीय वर्ष अनुत्तीर्ण, विजय कोकाटे (अपक्ष)-बी.ए. व्दितीय वर्ष उत्तीर्ण, सुरेंद्र अघम (आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी) आणि अनिल खांडेकर (प्रहार) हे दोघेही इयत्ता बारावी उत्तीर्ण आहेत. पदवीधारक ३ उमेदवारांमध्ये महेंद्र भातकुले (बहुजन मुक्तीपार्टी)-बी.ए., सुनीता कुमरे (अपक्ष)-बी.कॉम, प्रदीप चोपडे (अपक्ष), बी. कॉम. यांचा समावेश आहे. विधी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांची संख्या ३ आहे. त्यात हर्षवर्धन देशमुख (राकाँ)-बीए., एलएलबी., उमेश यावलकर (शिवसेना) एलएलबी., आशिष वानखडे (अपक्ष)-एलएलबी यांचा समावेश आहे. वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांची संख्या केवळ २ आहे. त्यात अनिल बोंडे (भाजपा), वसंत लुंगे (अपक्ष) हे दोघेही उमेदवार एमबीबीएस, (एमडी) शैक्षणिक अर्हताधारक आहेत. याशिवाय मृदुला श्रीकांत पाटील (बसपा) या एम.ए (फिलॉसॉफी) आणि पश्चिम बंगाल शासन मान्य डीएचएमएस ही परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.भारतीय दलित काँग्रेसचे उमेदवार कैलास कचरु वानखडे यांच्याविरुध्द ६, संजय देशमुख मनसे यांच्याविरुध्द २ तर प्रहारचे अनिल खांडेकर यांच्याविरुध्द १ फौजदारी प्रकरण दाखल असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. या चार उमेदवारांशिवाय इतर एकाही उमेदवारांवर कोणतेही गुन्हे दाखल नाहीत. शैक्षणिक अर्हतेपेक्षा जनतेच्या समस्या निवारण करणाऱ्या उमेदवाराला मतदार प्राधान्य देतील, हे निश्चित. (तालुका प्रतिनिधी)