शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शीच्या पाणीपुरवठ्यासाठी तांत्रिक कर्मचारी नाही

By admin | Updated: August 2, 2014 23:52 IST

उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी नगरपरिषद पाणीपुरवठा योजनेच्या जल शुद्धीकरण केंद्राला भेट देऊन जल शुद्धीकरणाची प्रक्रिया जाणून घेतली. तांत्रिक आणि प्रशिक्षित कर्मचारी नसतानाही

मोर्शी : उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी नगरपरिषद पाणीपुरवठा योजनेच्या जल शुद्धीकरण केंद्राला भेट देऊन जल शुद्धीकरणाची प्रक्रिया जाणून घेतली. तांत्रिक आणि प्रशिक्षित कर्मचारी नसतानाही पाणीपुरवठा योजना राबविली जात असल्याचे, शिवाय पाणीपुरवठा योजना जीवन प्राधिकरणकडे हस्तांतरित होणे गरजेचे असल्याचे मुख्याधिकारी सुमेध अलोणे यांनी सांगितले.नागरिकांचे आरोग्य धोक्यात मोर्शीत अशुद्ध पाणीपुरवठा’ या शीर्षकाखाली 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केले. त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी गुरुवारी न.प. पाणी पुरवठा योजनेच्या जलशुध्दीकरण केंद्राला भेट दिली. यावेळी मुख्याधिकारी अलोणे, बांधकाम विभागाचे अभियंते उपस्थित होते. मुख्याधिकारी अलोणे यांनी जलशुध्दीकरण प्रक्रियेची माहिती देताना कॅरीफाय व्हॉल्व्ह आणि अशुध्द पाणी जमा होणाऱ्या टाक्यातून पाणी वाहून नेण्याच्या प्रक्रियेतील दोषामुळे अशुध्द पाणी पुन्हा प्रक्रिया केलेल्या शुध्द पाण्यात मिसळत होते. त्यामुळे काही दिवस लोकांना चांगले पाणी मिळू शकले नसल्याचे विशद केले. आता व्हॉल्व्ह दुरुस्त झाल्याचे आणि अशुध्द पाणी ज्या टाक्यात गोळा होते, त्या टाक्यातील गाळ काढण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.पावसाळयाच्या दिवसांत अशुध्द पाण्यामुळे जलजन्य आजार वाढीस लागण्याची शक्यता विशद करतानाच असे झाले तर नगरपरिषद प्रशासन आणि अधिकारी जबाबदारी टाळू शकणार नाही, याची स्पष्ट जाणीव उपविभागीय अधिकारी वऱ्हाडे यांनी मुख्याधिकारी सुमेध अलोणे यांना करुन दिली. पाण्याचा प्रश्न नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असल्यामुळे या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचनाही दिल्या.