शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

११ वेळा मान्सूनची हुलकावणी

By admin | Updated: May 23, 2015 00:44 IST

खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांना मान्सूनची चिंता लागली आहे.

४४ वर्षांत आगमनातील विविधता : यंदा १० जूननंतर पावसाची शक्यता गजानन मोहोड अमरावतीखरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांना मान्सूनची चिंता लागली आहे. मागील वर्षाचा खरीप हंगाम मान्सूनच्या उशिरा येण्यामुळे उद्ध्वस्त झाला होता. गत ४४ वर्षांचा आढावा घेतला असता मान्सूनच्या आगमनात विविधता आढळून आली. तब्बल ११ वेळा मान्सूनचे उशिरा आगमन झाले आहे. २००२ मधील २७ जुलैला मान्सूनचे आगमन हे सर्वाधिक उशिराचे ठरले आहे. या पार्श्वभूमीवर यंदा १० जूननंतर मान्सूनचे होणारे आगमन शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठरणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या अखेर साधारणपणे मान्सूनची सुरुवात होते. गत ४४ वर्षांत सर्वात अगोेदर ५ जून १९९० मध्ये मान्सून आला होता. यंदा मृग नक्षत्राची सुरुवात ही ८ जूनला होत आहे. या नक्षत्रात पाऊस पडतो. किंबहुना पावसाची सुरुवातच मृग नक्षत्रात होते, अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. या अनुषंगाने खरीप पेरणीचे नियोजन केले जाते. यावर्षी २५ मे नंतर दोन दिवस पूर्वमान्सून व १० जुलै नंतर मान्सून जिल्ह्यात सक्रिय होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. यंदाच्या खरिपासाठी कृषी विभागाचे अनुमान पावसाला वेळेवर सुरुवात पण खंड पडण्याची शक्यता. खरीप पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेशा ओलाव्याच्या अभावाची शक्यता. विभागात सरासरी एवढ्या पावसाची शक्यता कमी. जून, जुलैमध्ये, पिण्याचे व सिंचानाचे पाणी तसेच वैरण टंचाईची शक्यता कडधान्याची वेळेवर पेरणी करण्यात अडचणी संभवतात. खरिपासाठी हे नियोजन आवश्यक.मूलस्थानी जलसंधारण, संरक्षित सिंचन, आंतरपीक आवश्यक. हलक्या, मध्यम जमिनीत कपाशीऐवजी ज्वारी, सोयाबीन, मका, तूर पिके घ्यावीत. चारा पीक उत्पादन कार्यक्रम राबविण्याची गरज. पूर्व मान्सूनचा पाऊस २४ व २५ मे रोजी येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात १० जूननंतर मान्सून सक्रिय होईल, अशी शक्यता आहे. - अनिल बंड, हवामान तज्ज्ञ,