निजामपुरात माकडांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:00 AM2020-08-03T05:00:00+5:302020-08-03T05:00:41+5:30

औषधी पालकांना अमरावतीहून आणावी लागली. घटनेची माहिती पालकांनी व गावकऱ्यांनी परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिली. या महितीवरून वनविभागाचे पथक गावात दाखल झाले. पण, या पथकालाही हुलकावणी देण्यात ते माकड यशस्वी ठरले आहे. दुसऱ्या गावातून हे एकच लालतोंडे माकड सहा महिन्यांपूर्वी निजामपूरात दाखल झाले. आधी या माकडाने प्राण्यांना, लहान बकऱ्या व कुत्र्याच्या पिलांना त्रास द्यायला सुरुवात केली.

Monkey terror in Nizampur | निजामपुरात माकडांची दहशत

निजामपुरात माकडांची दहशत

Next
ठळक मुद्देदोन महिन्याच्या बाळाला जखमी करून पाळण्याबाहेर ओढले : गावकऱ्यांसह जनावरेही त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील निजामपूर गाव सहा महिन्यांपासून लालतोंड्या माकडामुळे दहशतीखाली आहे. घरापुढे खेळणाऱ्या  मुला-मुलींसह ११ महिलांना त्याने आतापर्यंत जखमी केले. ओरबडून त्यांना चावा घेतला आहे. यादरम्यान १ ऑगस्टला त्या माकडाने घरात घुसून पाळण्यात झोपलेल्या सान्वी ढाकूलकर नामक अवघ्या दोन महिन्याच्या बाळाला नाकावर, गालावर ओरबडले. तिला गंभीर जखमी करून त्या पाळण्यातून कापडासह घराबाहेर ओढत नेण्याचा प्रयत्नही त्या माकडाने केला. बाजूलाच असलेल्या आईने आरडाओरड केल्यामुळे त्या बाळाला दारात टाकून माकड पळून गेले.
गंभीर जखमी झालेल्या या दोन महिन्याच्या बाळावर परतवाडा येथील खासगी दवाखान्यात औषधोपचार करण्यात आले. काही औषधी पालकांना अमरावतीहून आणावी लागली. घटनेची माहिती पालकांनी व गावकऱ्यांनी परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिली. या महितीवरून वनविभागाचे पथक गावात दाखल झाले. पण, या पथकालाही हुलकावणी देण्यात ते माकड यशस्वी ठरले आहे. दुसऱ्या गावातून हे एकच लालतोंडे माकड सहा महिन्यांपूर्वी निजामपूरात दाखल झाले. आधी या माकडाने प्राण्यांना, लहान बकऱ्या व कुत्र्याच्या पिलांना त्रास द्यायला सुरुवात केली. अचानक ते माकड मागून यायचे आणि पाळीव प्राण्यांच्या, बकऱ्यांच्या अंगावरील केस उपटायचे. ओरबाडलेदेखील.
अखेर माकडापायी त्रस्त होऊन श्रीकृष्ण नागापुरे व सुनंदा उमाळे यांनी आपल्याजवळील बकºया विकल्या. या प्राण्यांना त्रास दिल्यानंतर त्याने आपला मोर्चा सकाळी अंगणात सडासंमार्जन करणाऱ्या करणाऱ्या महिलांकडे वळविला. रविवारी निजामपूर येथील रंगुबाई राहाटे या ७५ वर्षीय वृद्धेच्या हातास त्या माकडाने चावा घेतला.

माकडाला पकडा
गावकऱ्यांसह ग्रामपंचायतने ठराव घेऊन त्या माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागासह प्रशासनाकडे केली आहे. वनविभागाने या माकडाला पकडण्याकरिता गावात दोन वेळा जाळे लावले. एक वेळा पिंजरा लावला, तर दोन वेळा रेस्क्यू टीमच्या मदतीने त्याला ट्रँक्यूलाईज (बेशुद्ध) करून पकडण्याचा प्रयत्न केला. पण, या माकडाला पकडण्यात वृत्त लिहिस्तोवर वनविभागाला यश आले नव्हते.

Web Title: Monkey terror in Nizampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.