'उमेदवार शिंदेंचे पण उमेदवारी द्यायची की नाही भाजप ठरवते, अफलातून कारभार'; बच्चू कडू यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 01:36 PM2024-06-21T13:36:28+5:302024-06-21T13:39:18+5:30

Bachchu Kadu : आमदार बच्चू कडू यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

MLA bachchu kadu criticized the BJP over the Lok Sabha elections | 'उमेदवार शिंदेंचे पण उमेदवारी द्यायची की नाही भाजप ठरवते, अफलातून कारभार'; बच्चू कडू यांचा टोला

'उमेदवार शिंदेंचे पण उमेदवारी द्यायची की नाही भाजप ठरवते, अफलातून कारभार'; बच्चू कडू यांचा टोला

Bachchu Kadu ( Marathi News ) : लोकसभा निवडणुका संपल्या. आता विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहेत. महायुती एकत्रित विधानसभा निवडणुका लढणार असल्याचे बोलले जात आहे. तर लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरुन अजुनही चर्चा सुरू आहेत. आमदार बच्चू कडू यांनी आज जागावाटपावरुन भाजपावर जोरदार निशाणा साधला. "हिंगोलीमध्ये एकनाथ शिंदे यांचा उमेदवार बदलला उमेदवार शिंदेंचा आणि ठरवते भाजपा हा अफलातून कारभार आहे',असा टोलाही आमदार बच्चू कडू यांनी लगावला. 

आरक्षण सुरक्षित कसे हे सांगा,लक्ष्मण हाकेंचा शिष्टमंडळाला प्रश्न; मुंबईतील चर्चेचे निमंत्रण स्वीकारले

"हेमंत पाटील यांची उमेदवारी नाकारली, त्या जागेवर उमेदवार द्यायचे की नाही हे भाजपा ठरवणार. अजित पवार यांच्या पक्षाचेही उमेदवार भाजपा ठरवत आहे. अमरावतीमध्ये सगळे एकत्र येऊन नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नका म्हणत होते पण, तिथे त्यांनी उमेदवारी दिली. - जिथे महायुतीचे उमेदवार पडले त्या जागेची भाजप मागणी करत होते पण बदलले नाही, सोबत घेऊन अशा प्रकारचे वागणे चुकीचे आहे अशामुळे भाजपवर कोणी विश्वास ठेवणार नाही, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले.

आमदार बच्चू कडू यांनी पोलीस अधीक्षकांना लिहिले पत्र

आमदार बच्चू कडू यांच्या बाबतीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आमदार कडू यांच्या जीवाला धोका असल्याची बातमी समोर आली आहे. याबाबत बच्चू कडू यांनी स्वत: जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र दिले आहे. जीवाला धोका असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. या पत्रामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे. 

पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात माझा अपघात झाल्याची अफवाही पसरवली जात असल्याचं म्हटलं आहे. "गोपनीय माहितीद्वारे माझ्या जीवाला धोका अलल्याचं कडू यांनी पक्षात म्हटले आहे. काही दिवसापासून बच्चू कडू यांच्या निकटवर्तीयांना अज्ञात व्यक्तीकडून फोन जात आहेत. या फोनमध्ये बच्चू कडू यांचा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी मागणी करण्यात आली आहे. 

"गेल्या काही दिवसापासून मी अमरावती जिल्ह्याच्या बाहेर गेलो की माझ्या जवळच्या व्यक्तीला फोन येतो आणि अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या सगळ्यापाठिमागे कोण आहे माहित नाही, पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घ्यावा. कार्यकर्त्यांनाही अज्ञात व्यक्तीकडून फोन येत आहे. काही लोक मुद्दाम करत असतील. आपण सावध राहूया, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले.  

Web Title: MLA bachchu kadu criticized the BJP over the Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.