शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन आकार’; नीट, जेईई, सीईटीचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 20:11 IST

आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्थ शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळांमध्ये इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे धडे घेता यावे, यासाठी ‘मिशन आकार’हा प्रकल्प राबविला जात आहे.

ठळक मुद्देशासकीय, अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे धडे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्थ शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळांमध्ये इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे धडे घेता यावे, यासाठी ‘मिशन आकार’हा प्रकल्प राबविला जात आहे. यात विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना नीट, जेईई, सीईटीचे मार्गदर्शन देण्यात येत आहे.आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालय अंतर्गत सात प्रकल्पांमध्ये ८३ शासकीय, तर १२२ अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहे. त्यापैकी शासकीय आश्रमशाळांशी संलग्न २५, तर अनुदानित आश्रमशाळांशी संलग्न ३७ उच्च माध्यमिकचे वर्ग आहेत. या उच्च माध्यमिक आश्रमशाळांमध्ये बारावीत विज्ञान शाखांमध्ये विद्यार्थ्यांना नीट, जेईई, सीईटीच्या परीक्षेबाबतचे मार्गदर्शन करण्याचा ‘मिशन आकार’ हा प्रकल्प आहे. या माध्यमातून वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रात आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मार्गदर्शन दिले जाते.

यंदा २० ते ३० जून या दरम्यान हा प्रकल्प आदिवासी विकास विभाग, नागपूर येथील आकार बहुउद्देशीय विकास संस्था व आकार ग्रुप ऑफ इन्टिट्यूशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला गेला. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना नीट, जेईई, सीईटीचे परीक्षेबाबतचे नि:शुल्क मार्गदर्शन करण्यात आले. या ऑनलाईन वर्गासाठी गुगलवर उपलब्ध अर्जाद्वारे धारणी, पांढरकवडा, पुसद, किनवट, कळमुनरी, औरंगाबाद व अकोला प्रकल्प कार्यालय अंतर्गत शासकीय, अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या २५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, हे विशेष. ऑनलाईन प्रशिक्षण वर्गात आशिष दर्यापूरकर, सचिन बोंगावार, वीरेंद्र सांगोडे, श्रीमती मीनाक्षी, धनराज लांजे, सुषमा गौतम या तज्ज्ञ प्राध्यापक मंडळींनी मार्गदर्शन केले.दरवर्षी दोन महिन्यांचा निवासी मार्गदर्शन वर्ग राबविला जातो. मात्र, यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांना नीट, जेईई, सीईटीचे परीक्षेबाबतचे नि:शुल्क मार्गदर्शन वर्ग घेण्यात आले. याचा विद्यार्थ्यांना निश्चितच वैद्यकीय, अभियांत्रिकी अथवा चांगल्या महाविद्यालयात प्रवेशासाठी लाभ होईल.- विनोद पाटील, अपर आयुक्त, ‘ट्रायबल’ अमरावती.ऑनलाईन प्रशिक्षण वर्गकोरोना संसर्गाने इयत्ता बारावीचे विद्यार्थी लॉकडाऊनमुळे घरी होते. त्यामुळे विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आले. गुगल मीट अ‍ॅपच्या माध्यमातून मोबाइलद्वारे विद्यार्थ्यांना नीट, जेईई, सीईटी परीक्षेबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले. गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र विषयांचे ऑनलाईन मार्गदर्शन मिळाले तसेच पीडीएफ स्वरूपात विद्यार्थ्यांना नोट्स पुरविण्यात आल्या.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र