शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सूक्ष्म व लघु उद्योगात अमरावती विभाग माघारला

By admin | Updated: August 20, 2014 00:38 IST

पुणे विभाग राज्यात आघाडीवर

वाशिम : राज्याच्या आर्थिक जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणार्‍या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगधंद्यामध्ये अमरावती विभाग माघारला आहे. २0१३ साली पूणे विभागात राज्यात सर्वाधिक ७५ हजार ८0 तर अमरावती विभागात सर्वात कमी सात हजार ४२६ सुक्ष्म, लघु व मध्यम प्रकारचे उद्योगधंदे यशस्वीपणे उभे राहु शकले. यावर्षीच्या सहा महिन्यांमध्येही हिच परिस्थिती कायम राहीली. अर्थव्यवस्था मजबूत करणे आणि रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासन उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी अनुदानाची योजना राबवित आहे. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच वस्तुनिर्माण आणि सेवा पुरविणार्‍या उपक्रमांतूनही रोजगार निर्मिती होऊ शकते. वस्तुनिर्माण उपक्रमांचे त्यांच्या यंत्रसामग्रीतील गुंतवणुकीच्या आधारे व सेवा पुरविणार्‍या उपक्रमांचे साधनसामग्रीच्या मुल्याच्या आधारे सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम (उद्योग) असे वर्गीकरण केले जाते. सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगात पूणे विभाग सर्वात आघाडीवर असल्याची साक्ष उद्योग संचालनालयाची आकडेवारी देत आहे. २0१३ या वर्षात पूणे विभागात ७५ हजार ८0 उद्योगांमधून आठ लाख ६८ बेरोजगारांना रोजगार मिळाला. त्याखालोखाल कोकण विभागात २९ हजार ६0३ उद्योगांमधून चार लाख ६३ हजार रोजगारनिर्मिती झाली. नाशिक विभागात २१ हजार ४७७ मधून दोन लाख ७0 हजार तर मुंबई विभागात १८ हजार ३८१ उद्योगांमधून दोन लाख ८५ हजार बेरोजगारांना काम मिळाले. नागपूर विभागात १७ हजार २0८ उद्योगांमधून दोन लाख ११ हजार, औरंगाबाद विभागात ११ हजार ९५४ उद्योगांमधून एक लाख ४९ हजार तर अमरावती विभागात सर्वात कमी सात हजार ४२६ उद्योगांमधून ९0 हजार लोकांना रोजगार मिळाला. उद्योग संचालनालयाच्या राज्यस्तरीय लेखाजोख्यावर नजर टाकली तर सुक्ष्म, लघु व मध्यम स्वरुपाच्या उद्योगधंद्यात अमरावती विभाग मागासलेल्या स्थितीतच असल्याचे स्पष्ट होते.