अश्लील ग्रुपवरून महिलेला संदेश, छायाचित्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:29 IST2020-12-13T04:29:37+5:302020-12-13T04:29:37+5:30

व्हॉट्सॲपची काळी बाजू, सायबर पोलिसांनी नोंदविला गुन्हा अमरावती : व्हॉट्सअपच्या एका अश्लील ग्रुपवर महिलेचा क्रमांक ॲड करण्यात आला. ...

Message to a woman from a porn group, photos | अश्लील ग्रुपवरून महिलेला संदेश, छायाचित्रे

अश्लील ग्रुपवरून महिलेला संदेश, छायाचित्रे

व्हॉट्सॲपची काळी बाजू, सायबर पोलिसांनी नोंदविला गुन्हा

अमरावती : व्हॉट्सअपच्या एका अश्लील ग्रुपवर महिलेचा क्रमांक ॲड करण्यात आला. यानंतर या ग्रुपमधून पाठविले जाणारे संदेश, छायाचित्र, व्हिडीओ यामुळे ती त्रस्त झाली. अखेर या महिलेने सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलीस सूत्रांनुसार, व्यंकटेश कॉलनी येथील महिलेला २४ ऑक्टोबर ते १० डिसेंबर दरम्यान घडलेल्या या घटनाक्रमाची फिर्याद सायबर पोलिसांकडे दाखल केली. त्यानुसार, अश्लील मॅसेज व व्हिडीओमुळे महिला त्रस्त झाली तसेच तिला विविध क्रमांकांवरून त्रासदायक कॉल करण्यात येत होते. पोलिसांनी याप्रकरणी शुक्रवारी एका मोबाईलधारकाविरुद्ध भादंविचे कलम ३५४ (अ), ३५४ (ड), सहकलम ६७, ६६ (अ) माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास सायबर शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश टाले करीत आहेत.

Web Title: Message to a woman from a porn group, photos