शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

झोलाछाप झाला एमडी डॉक्टर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 5:00 AM

नितीन गोंडाणे यांनी तेथेच कार्यरत भावाला विचारणा केली. त्यांनी संशय व्यक्त केल्यामुळे नितीन गोंडाणे यांनी डबलेला वारंवार विचारणा केली. अखेर त्याने आपण डॉक्टर नसल्याची कबुली दिली. तसा कबुलीनामासुद्धा लिहून दिला. त्यांच्या तक्रारीवरून ठाणेदार पुंडलिक मेश्राम, दुय्यम ठाणेदार नितीन मगर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले यांच्या पथकाने शनिवारी अविनाश डबलेला अटक केली.

ठळक मुद्देकिरणनगरात थाटले क्लिनिक । दोन वर्षांपासून नागरिकांवर ‘प्रॅक्टिस’

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एमडी ही पदव्युत्तर पदवी धारण करून रुग्णसेवेचा आव आणणाऱ्या किरणनगरातील बोगस डॉक्टरने दोन वर्षांपासून अनेक नागरिकांवर ‘प्रॅक्टिस’ केली. त्याचा बनावटपणा शनिवारी वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या युवकाने उघड करून त्याला गजाआड केले.अविनाश वसंत डबले (३८ रा. भवते ले-आऊट) असे बोगस डॉक्टरचे नाव आहे. फ्रेजरपुरा हद्दीतील किरणनगर नं. २ येथे त्याचे क्लिनिक आहे. फ्रेजरपुरा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ४९९, ४२० अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती महानगरपालिका व नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून त्याच्या कागदपत्रांची खात्री करून घेतली जात आहे. अविनाश डबले हा दोन वर्षांपूर्वी सर्वज्ञ हेल्थकेअर फाऊन्डेशन अंतर्गत बेनोडा येथील शांतीनगरात क्लिनिक चालवित होता. त्याने क्लिनिकमध्ये ‘डॉ. अविनाश वसंत डबले एम.डी. (मेडिसिन)’ असे मोठे फलक लावून ठेवले होते. दहा दिवसांपूर्वी डबलेने बेनोडातील क्लिनिक किरणनगर क्रमांक २ येथे शिफ्ट केले.पोलीस सूत्रांनुसार, वैद्यकीय शिक्षण घेत असलेले नितीन रमेश गोंडाणे (२७, रा. उत्तमनगर) हे वडिलांना रक्तदाबाच्या उपचारासाठी अविनाश डबलेच्या शांतीनगरातील क्लिनिकला घेऊन गेले होते. त्यांची वहिनी पूजा सतीश गोंडाणे यांचासुद्धा तेथे उपचार सुरूहोता. डबलेने सन २००४ मध्ये नागपूर जीएमसीमधून शिक्षण घेतले होते. नितीन गोंडाणे यांनी तेथेच कार्यरत भावाला विचारणा केली. त्यांनी संशय व्यक्त केल्यामुळे नितीन गोंडाणे यांनी डबलेला वारंवार विचारणा केली. अखेर त्याने आपण डॉक्टर नसल्याची कबुली दिली. तसा कबुलीनामासुद्धा लिहून दिला. त्यांच्या तक्रारीवरून ठाणेदार पुंडलिक मेश्राम, दुय्यम ठाणेदार नितीन मगर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले यांच्या पथकाने शनिवारी अविनाश डबलेला अटक केली.पोलीस कोठडीची मागणीअविनाश डबले हा गेल्या अनेक वर्षांपासून जागा बदलून दवाखाना चालवित आहे. रुग्णांना ‘एमडी मेडिसिन’ नमूद असलेल्या लेटर पॅडवर औषधी लिहून देत होता. तसे शिक्केसुद्धा तयार करून घेतले. पोलिसांनी लेटरपॅड, शिक्के आणि प्रमाणेपत्रे जप्त केली आहे. पीएसआय मंढाळे यांनी आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली. 

टॅग्स :doctorडॉक्टरfraudधोकेबाजी