शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदाची निवडणूक सप्टेंबरमध्ये

By admin | Updated: July 9, 2014 23:12 IST

नगराध्यक्षपदाच्या मुदतवाढीच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आता महापौरपदाची निवडणूकही निर्धारित वेळेत होण्याचे संकेत आहेत. निर्धारित कार्यक्रमानुसार महापौरपदाची निवडणूक

काँगे्रस-राष्ट्रवादीत तेढ : सर्वसाधारण जागेच्या आरक्षणाची शक्यताअमरावती : नगराध्यक्षपदाच्या मुदतवाढीच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आता महापौरपदाची निवडणूकही निर्धारित वेळेत होण्याचे संकेत आहेत. निर्धारित कार्यक्रमानुसार महापौरपदाची निवडणूक सप्टेंबर महिन्यातच होईल.शहाराचा १४ वा महापौर कोण? याबाबत अद्यापही राजकीय चित्र अस्पष्ट आहे. महापालिकेत काँग्रेस - राष्ट्रवादीची सत्ता आहे. या दोन्ही पक्षात सत्तावाटपाचे सूत्रदेखील ठरले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर महापालिकेच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाल्याचे सर्वश्रुत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटात विभागली गेल्याने संजय खोडके गटाला मोठा हादरा बसला आहे. राष्ट्रवादीत गटनेते पदावरुन न्यायालयीन लढाई सुरु झाली आहे. सदस्य अपात्रतेचा तिढा देखील कायम आहे. अशातच पुढील महापौरपदावर राष्ट्रवादीचा दावा असल्याने सप्टेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत काय चित्र असेल, याबाबत उत्सुकतेचे वातावरण आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करताना आ. रावसाहेब शेखावत आणि माजी आमदार सुलभा खोडके यांनी आपसात अंतर्गत करार करुन काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर दोन वर्षांत राजकीय चित्र पूर्णपणे पालटले. यापूर्वी राष्ट्रवादीवर पूर्णपणे संजय खोडके यांचे वर्चस्व होते. परंतु लोकसभा निवडणुकीनंतर घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर एकूणच राजकारण बदलले आहे.