शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पुतण्याच निघाला १३ लाखांच्या चोरीचा मास्टरमाइंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:21 IST

पान २ चे लिड पंधरवाड्यानंतर पोलिसांकडून उलगडा, मुद्देमाल हस्तगत, आरोपीला अटक धारणी : येथील माजी नगरसेवक तथा व्यवसायिक अब्दुल ...

पान २ चे लिड

पंधरवाड्यानंतर पोलिसांकडून उलगडा, मुद्देमाल हस्तगत, आरोपीला अटक

धारणी : येथील माजी नगरसेवक तथा व्यवसायिक अब्दुल आसिफ अ. रऊफ सौदागर (५९, मांडवा रोड, वार्ड नं.१६) यांच्या घरी झालेल्या धाडसी चोरीचा उलगडा करण्यात स्थानिक पोलिसांनी यश आले आहे. घटनेच्या १५ दिवसांनंतर सौदागर यांचा पुतण्याच चोर असल्याचे उघड झाले. याप्रकरणी धारणी पोलिसांनी फिर्यादींचा पुतण्या मोहम्मद वसीम सौदागर (३३, रा. धारणी) याला बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास अटक केली. आरोपीने चोरलेल्या रोख रकमेपैकी १ लाख रुपये खर्च केले. त्याचेकडून चोरीतील सोने, चांदीच्या दागिन्यांसह व उर्वरित रोख जप्त करण्यात आली. त्याने चोरीची कबुली दिली आहे.

अ. आसिफ सौदागर हे त्यांच्या तीन भावांसह एकाच घरात राहतात. १७ जानेवारी रोजी सकाळी संपूर्ण सौदागर कुटुंब अचलपूर येथे एका कार्यक्रमानिमित्त गेले होते. ते १८ जानेवारी रोजी सकाळी ९ च्या सुमारास धारणी येथे घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघड झाला होता. तक्रारीनुसार, ९ लाख ३० हजार ४२० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ७३ हजार २०० रुपयांची चांदीचे दागिने, तर २ लाख २५ हजार रुपये रोख, मनगटी घड्याळ असा एकूण १२ लाख ३३ हजार ६२० रुपयांचा ऐवज चोरीला गेला. याप्रकरणी १९ जानेवारी रोजी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनास्थळी ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. शहरातील मुख्य महामार्गावरील दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले. त्यामध्ये संशयास्पद आढळणाऱ्या व्यक्तींची चौकशी करण्यात आली. धारणी पोलिसांसोबतच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकदेखील चोरीचा तपास करीत होते.

पोलीस खाक्या

अमरावतीहून बोलावलेले श्वान घटनास्थळी घुटमळले. मात्र, त्यातून ठोस असे हाती आले नाही. ठसेतज्ज्ञांचे निरीक्षणदेखील सुगाव्यासाठी पुरक नव्हते. त्यामुळे धारणी पोलिसांनी फिर्यादीच्या संयुक्त कुटूंबातील सदस्यांकडे मोर्चा वळविला. पोलिसी खाक्या दाखवताच सौदागर यांचा पुतण्याच चोरीच्या घटनेचा मास्टर असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून घरफोडीतील संपूर्ण दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी मोहम्मद वसीम सौदागर हा फिर्यादी आसिफ सौदागर यांच्या भावाचा मुलगा आहे. ठाणेदार विलास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सचिन होले आणि इतर करीत आहे.

पोलिसांवर आरोप

या घटनेचा तपास करताना पोलिसांनी सौदागर यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीसह तिच्या पती व नातलगांना विचारपूस करताना मारहाण केल्याची तक्रार आहे. मात्र, पोलिसांनी तो आक्षेप खारीज केला आहे.

कोट

या चोरीप्रकरणी फिर्यादी अ. आसिफ सौदागर यांच्या पुतण्याला अटक केली. त्याचेकडून चोरीतील संपुर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.

- विलास कुळकर्णी, ठाणेदार

पोलीस ठाणे, धारणी

--------------------