जंगलात सोडून दिलेल्या गर्भवतीवर सामूहिक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 05:15 IST2017-08-19T05:15:02+5:302017-08-19T05:15:05+5:30

२४ वर्षीय पीडितेने चांदूररेल्वे पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हुंडा मागणाºया पतीसह सासू, सासरे, नणंदेसह चार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला

Mass rape on pregnant women left in the forest | जंगलात सोडून दिलेल्या गर्भवतीवर सामूहिक बलात्कार

जंगलात सोडून दिलेल्या गर्भवतीवर सामूहिक बलात्कार

चांदूररेल्वे (जि. अमरावती) : हुड्यांची मागणी करीत हात व डोळ्यावर पट्टी बांधून जंगलात सोडून दिलेल्या गर्भवतीवर सामूहिक बलात्कार झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी २४ वर्षीय पीडितेने चांदूररेल्वे पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हुंडा मागणाºया पतीसह सासू, सासरे, नणंदेसह चार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, पती भानुसिंग चितोडिया, सासू कश्मिरीबाई ऊर्फ लक्ष्मी चितोडिया, सासरे शेरसिंग चितोडिया व नणंद लाली चितोडिया २५ मार्च २०१७ रोजी एका जंगलातील अज्ञातस्थळी घेऊन गेले. जंगलात जाऊन तेथून त्यांनी पीडितेच्या माहेरच्या मंडळींना भ्रमणध्वनीवरून कॉल करून पैशांची मागणी केली. मात्र, पैसे नसल्याचे उत्तर मिळाल्याने याठिकाणी वाद झाला. जंगलात तीन-चार अज्ञात व्यक्तींनी तिच्यावर अत्याचार केले. आरोपी परराज्यातील आहेत. त्यांचा ठावठिकाणा मिळाला असून त्यांना त्वरित अटक करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक ब्रह्मा शेळके यांनी सांगितले.

Web Title: Mass rape on pregnant women left in the forest