शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मनोरुग्ण शकुंतला इर्विनमधून बेपत्ता

By admin | Updated: February 15, 2015 00:13 IST

येथील मनोरुग्ण शकुंतला आत्माराम इंगोले वय ५५ हिला २४ डिसेंबर २०१४ रोजी अमरावती येथील इर्विन हॉस्पीटल मध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात अले.

मनीष कहाते वाढोणा रामनाथयेथील मनोरुग्ण शकुंतला आत्माराम इंगोले वय ५५ हिला २४ डिसेंबर २०१४ रोजी अमरावती येथील इर्विन हॉस्पीटल मध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात अले. परंतु इर्विन हॉस्पीटल ने ६ जानेवारी २०१५ रोजी नागपूर स्थित जी.एम.सी. रुग्णालयात पुढील उपचाराकरिता रेफर केले. मात्र जी.एम.सी. रुग्णालयात नातेवाईकांनी चौकशी केली असता शकुंतला नावाचे कोणतेही रुग्ण नसल्याचे सांगितले. त्यामुळे कुठे गेली? याची तक्रार सिटी कोतवाली पोलिस स्टेशन ला करण्यात आली आहे. येथील शिक्षिका शकुंतला इंगोले ही गेल्या अनेक वर्षापासून मनोरुग्ण अहे. तिला नागपूर आणि अमरावती येथील विविध रुग्णालयात उपचार सुरु होते. संपूर्ण गावात ती वेड्यासारखी फिरत होती. अशातच तिच्या पायाला कुत्रा चावला त्यामधुन किडे पडून दुर्गंधी येत होती. म्हणुन नातेवाईक आणि गावकऱ्यांनी तिला १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने इर्विन रुग्णालयात उपचार करण्याकरिता दाखल केले. परंतु शकुंतला उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने तिला नागपूर स्थित जी.एम.सी. रुग्णालयात पुढील उपचारा करिता इर्विन हॉस्पीटलने दाखल केले. इर्विन हॉस्पीटलच्या रुग्णवाहिकेने शकुंतलाला नागपूरकडे नेत असताना वाटेत कारंजा ते तळेगाव मार्गावर रुग्णवाहिगकाच्या कर्मचारी अणि चालकाने जंगलात उतरुन दिल्याची माहिती तिच्या नातेवाईकांना मिळाली. ती आता कुठे आहे याचा शोेध गावकरी घेत आहे.शकुंतलाचा शोध घेण्याकरिता तिचे नातेवाईक आणि गावातील मंडळी महेंद्र माटोडे, दिलीप शिोगोले, गौतम कुळकर्णी, प्रवीण तांबट, दिपक शहाडे, दिपक उकंडे, सतीश येवले, गुलाब माळीक, नितिन जकवार, विलास माळीक, चेतन माटोडे, विनोद चौधरी, संजय माटोडे, अनिल कोपरकर यांच्या सहीनिशी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात शकुंतलेचा शोध घेण्यासंबंधी तक्रार दिली. मात्र पोलीस स्टेशनने अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई केली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे इर्विन हॉस्पिटलचा ६ जानेवारी रोजीची संदर्भचिठ्ठीसुध्दा जीएमसी रुग्णलयाच्या नावाने दिली होती. मात्र शकुंतला संबंधीत रुग्णालयात पोहचलीच नाही.