शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समितीत ‘महिला राज’

By admin | Updated: September 14, 2014 23:46 IST

रविवारी झालेल्या निवडणुकीत पंचायत समिती सभापती पदी काँग्रेसच्या सोनाली प्रशांत देशमुख तर उपसभापती पदी प्रहारचे गजानन मोरे यांची अविरोध निवड झाली.

अचलपुरात काँग्रेस-प्रहारअचलपूर : रविवारी झालेल्या निवडणुकीत पंचायत समिती सभापती पदी काँग्रेसच्या सोनाली प्रशांत देशमुख तर उपसभापती पदी प्रहारचे गजानन मोरे यांची अविरोध निवड झाली. अचलपूर पं.स. वर्तुळात दहा सदस्य असून त्यामध्ये पाच काँग्रेस, चार प्रहार व एक भाजप सदस्याचा समावेश आहे. अचलपूर तालुक्यातील गावांचा मेळघाट, दर्यापूर व अचलपूर अशा तीन मतदारसंघांत समावेश आहे. अशातच संभावित नेते वजा उमेदवारीचा प्रहारला वाढता विरोध पत्करत मार्ग काढण्यात आला. सभापतीपदी सोनाली देशमुख तर उपसभापती गजानन मोरे यांचे नावावर शनिवारी शिक्कामोर्तब झाले. काँग्रेसचे पं.स. सदस्य हेमंत चांदूरकर, किसन दहीकर, मावळते सभापती ओमश्री घोरे, संजीवनी वानखडे, तर प्रहारचे दीपक धुरधर, मीनाक्षी ठाकरे, प्रितीताई घाडगे आदी उपस्थित होते. यावेळी जल्लोष करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे अमोल बोरेकर, जयदेवराव गायकवाड, राजेंद्र गोरले, साधुराम येवले, गंगाधर चौधरी, प्रकाश घोम, देवीदास घोम, जगतराव देशमुख, गणेश पटारे, रमेश लोळे, पंजाब इंगळे, अनिस सरपंच अनिल आकोडे, बब्बूभाई, युसूफ भाई, पुरुषोत्तम बोरकार, गौरव काळे आदींचा समावेश होता.रविवारी निवडणूक असल्याने कार्यकर्त्याची अनुपस्थिती जानवत होती. तर निवडणूक अधिकारी तहसीलदार मनोज लोनकर, बीडीओ बाळासाहेब रायबोले लिपिक शे. युसूफ यांनी कामकाज पाहिले. अमरावती,भातकुलीवर शिवेसेनेचा झेंडाअमरावती : अमरावती व भातकुली पंचायत समिती सभापती व उपसभापतीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये दोन्ही पंचायत समितीवर शिवसेनेने झेंडा फडकविला आहे. अमरावती पंचायत समिती सभापती पदी शिवसेनेचे आशिष धर्माळे यांची विनविरोध निवड झाली असून भातकुली पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवेसनेच्या सुनीता वानखडे यांची ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली. रविवारी पंचायत समिती निवडणूक शांततेत पार पडली. अमरावती व भातकुली पंचायत समितीच्या कार्यालयात दुपारी ३ वाजता निवडणुकीला सुरुवात झाल्यावर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. अमरावती पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी शिवसेनेचे अनिल गंधे व आशिष धर्माळे यांंनी नामांकन दाखल केले होते. मात्र अनिल गंधे यांनी वेळेवर अर्ज मागे घेतल्याने आशिष धर्माळे यांची अविरोध निवड झाली. उपसभापतीसाठी शिवसेनेचे अनिल चांगोले व राष्ट्रवादीचे भास्कर गभणे यांनी नामाकंन दाखल केले होते. यामध्ये अनिल चांगोले यांनी अर्ज मागे घेतल्याने उपसभापती भास्कर गभणे विजयी झाले. यावेळी शिवसेनेच्या सुवर्णा वाकोडे, प्रहारच्या उज्वला उगले, क्रॉग्रेसच्या सुनंदा केचे, ज्योती यावलीकर असे सदस्य उपस्थित होते. भातकुली पंचायत समितीत सभापतीपदासाठी काँगे्रसचे जयंता देशमुख व शिवेसेनेच्या सुनीता वानखडे तर उपसभापतीकरिता राष्ट्रवादीचे अजीज पटेल व युवा स्वाभिमानीच्या संगीता चुनकीकर यांनी नामांकन दाखल केले होते. काँॅग्रेसचे व शिवसेनेचे तीन उमेदवार रिंगणात होते. यावेळी अजीज पटेल यांनी सेनेला पाठिंबा दिला. तर युवा स्वाभिमानीच्या संगीता चुनकीकर यांच्यासोबत काँग्रेसने हातमिळवणी केली. दोन्ही गटाचे चार-चार उमेदवार झाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी ईश्वरचिठ्ठी काढली. यामध्ये शिवसेनेच्या सुनीता वानखडे त्यांची सभापतीपदी, तर उपसभापतीपदी संगीता चुनकीकर या विजयी ठरल्या. अमरावती पंचायत समितीसाठी निवडणूक अधिकारी तहसीलदार सुरेश बगळे व समिती सचिव प्रमोद कापडे तर भातकुली पंचायत समितीत अध्यासिय अधिकारी अजितकुमार येळे व गटविकास अधिकारी एस.पी. थोरात यांनी कार्यभार साभांळला.