कुष्ठरोग निर्मूलन विभागात महात्मा गांधी पुण्यतिथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:29 IST2021-02-05T05:29:40+5:302021-02-05T05:29:40+5:30

अमरावती : येथील सहायक संचालक कुष्ठरोग निर्मूलन कार्यालयात शनिवारी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन दिन व राष्टपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी ...

Mahatma Gandhi Punyatithi in the Department of Leprosy Eradication | कुष्ठरोग निर्मूलन विभागात महात्मा गांधी पुण्यतिथी

कुष्ठरोग निर्मूलन विभागात महात्मा गांधी पुण्यतिथी

अमरावती : येथील सहायक संचालक कुष्ठरोग निर्मूलन कार्यालयात शनिवारी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन दिन व राष्टपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी कुष्ठरुग्ण आणि क्षयरुग्ण शोध मोहिमेचे उद्घाटनदेखील डॉ. अंकुश सिरसाट यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले.डॉ. आर.एस. आडकीकर सहायक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग पुणे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रात १ ते १६ डिसेंबर दरम्यान जिल्हाभरात कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधमोहीम राबविण्यात आली. यात जिल्ह्याला २४३ रुग्ण निदानाचे लक्ष्य देण्यात आले होते. १७८ रुग्णांचे निदान करण्यात आले. त्यानंतर आता १ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान ही मोहीम सहायक संचालक के.एस. वासनिक, डीएचओ दिलीप रणमले, सी.एस. श्यामसुंदर निकम यांच्या नेतृत्वात राबविण्यात येणार आहे. याचे उद्घाटन हुतात्मा दिनी करण्यात आले. ही मोहीम जिल्ह्यातील अतिजोखमीच्या ९११ गावांत राबविली जाईल. यासाठी आरोग्य सेवक, आशांद्वारा प्रत्येक घरी सर्वेक्षण करून कुष्ठरोगाचे निदान केले जाणार असल्याची माहिती डॉ. अंकुश सिरसाट यांनी दिली.

बॉक्स

७० टक्क्यांवर कामालाच मानधन

९११ गावांमध्ये केलेल्या सर्वेक्षणांती आशा व आरोग्यसेवकांनी १०० टक्के कार्य केल्यास १००० रुपये संपूर्ण मोहिमेतील कार्याचा मोबदला दिला जाईल. ९० ते ९९ टक्के कार्य केल्यास ९०० रुपये देण्यात येतील. ८० ते ८९ टक्के कार्य केल्यास ८०० रुपये, तर ७० ते ७९ टक्के कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ७०० रुपये मानधनाची तरतूद केली आहे. मात्र, ७० टक्क्यांच्या आत ज्यांची कामगिरी झाली असेल त्यांना मानधन मिळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

----------

Web Title: Mahatma Gandhi Punyatithi in the Department of Leprosy Eradication