शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

सरत्या वर्षात खंडग्रास चंद्रग्रहण

By admin | Updated: December 22, 2015 00:24 IST

अंतराळात दररोज असंख्य घडामोडी घडतात. २०१५ हे वर्ष अनेक खगोलीय घटनांनी गाजले. खंडग्रास चंद्रग्रहण, ...

उल्कावर्षाव : गुरु-सूर्य प्रतियुती अमरावती : अंतराळात दररोज असंख्य घडामोडी घडतात. २०१५ हे वर्ष अनेक खगोलीय घटनांनी गाजले. खंडग्रास चंद्रग्रहण, गुरू-सूर्य प्रतियुती, उल्कावर्षाव यासारखे विहंगम दृश्य नागरिकांना बघायला मिळाले.आकाशात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीला खगोलशास्त्रात फार महत्त्व आहे. २०१५ या वर्षात अनेक खगोलीय घटनांची रेलचेल राहिली. ४ जानेवारी रोजी पृथ्वी-सूर्य हे अंतर कमीत कमी होते. या घटनेला खगोलशास्त्रात पेरेहेलीआॅन असे म्हणतात. या दिवशी पृथ्वी सूर्य हे अंतर १४७ दशलक्ष किमी होते. ८ जानेवारीला सायंकाळी पूर्व क्षितिजावर चंद्राजवळ गुरू ग्रहाचे दर्शन झाले. हा प्रसंग सर्वांना सुखावणारा होता. १० जानेवारीला सायंकाळी पश्चिम क्षितिजावर शुक्राशेजारी बुध ग्रह दिसला. ६ फेब्रुवारी रोजी गुरू-सूर्य प्रतियुती झाली. या दिवशी पृथ्वीपासून गुरूचे अंतर हे कमीत कमी होते. टेलीस्कोपमधून गुरूचे चंद्र खगोलप्रेमींना पाहता आले. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पश्चिम क्षितिजावर चंद्रकोरीजवळ मंगळ व शुक्र जवळ आले होते. २० मार्च रोजी खग्रास सूर्यग्रहण बघण्याची कमालीची उत्सुकता तमाम नागरिकांना होती. परंतु हे ग्रहण ग्रिनलँड व सैयबेरीयामधून दिसले. वर्षभरात घडलेल्या खगोलीय घटनांमध्ये २२ मार्च रोजी दिवस व रात्र समान राहिली. ४ एप्रिल या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण बघण्याची पर्वणी नागरिकांना मिळाली. हे ग्रहण मात्र भारतात दिसले. वरील सर्व घटना या नैसर्गिक असून याचा राशीनुसार मानवी जीवनावर कुठलाही वाईट परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. (प्रतिनिधी)शनीच्या सुंदर रिंगचे दर्शन२३ मे रोजी शनी आणि सूर्य यांच्यात प्रतियुती झाली. या दिवशी शनी पृथ्वीच्या जवळ होता. टेलिस्कोपमधून शनीची सुंदर रिंंग तमाम खगोल जिज्ञासूंना पाहता आली. ही रिंंग साध्या डोळ्यांनी दिसली नाही.सिंह राशीतून झाला उल्कावर्षाव१७ ते २० नोव्हेंबर या काळात सिंह राशीतून उल्कावर्षाव झाला. आकाशातून तुटणाऱ्या तारांचे विलोभनीय दृश्य नागरिकांना पहायला मिळाले. १३ ते १७ डिसेंबर या काळात मिथून राशीतून उल्कावर्षाव झाल्याचे दिसून आले.सरत्या वर्षात घडलेल्या सर्व घटना या नैसर्गिक होत्या. याचा राशीनुसार मानवी जीवनावर कुठल्याही वाईट परिणाम झाला नाही. नागरिकांनी कर्मकांडाच्या मागे न लागता आकाशात पुढील वर्षात घडणाऱ्या खगोलीय घटनांचे निरीक्षण करून आनंद घ्यावा.-विजय गिरुळकर, हौशी खगोल अभ्यासक, अमरावती.