शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

वडाळी बगिच्यात युगुलांचा ‘प्रेमालाप’

By admin | Updated: December 13, 2015 00:21 IST

निसर्गरम्य आणि हिरवागार वडाळी बगिचा तरूण प्रेमीयुगुलांचे आश्रयस्थान बनले आहे. भरदुपारी येथे झाडाझुडुपांत तर कुठे हिरव्यागार गालिचावर...

सीसीटीव्हीचा धाक नाही : नागरिकांची कुचंबणा, कारवाई केव्हा?अमरावती : निसर्गरम्य आणि हिरवागार वडाळी बगिचा तरूण प्रेमीयुगुलांचे आश्रयस्थान बनले आहे. भरदुपारी येथे झाडाझुडुपांत तर कुठे हिरव्यागार गालिचावर हा ‘प्रेमालाप’ खुल्लमखुल्ला सुरू असतो. या परिसरातील सीसीटीव्हीसोबतच पोलिसांचाही हा ‘लव्हबर्डस’ना धाक उरलेला नाही, ‘फक्त कुटुंबासाठी प्रवेश’ अशी अट असताना प्रवेशाधिकार स्वत:कडे सुरक्षित ठेवलेल्या संबंधित एजंसीच्या नैतिकतेवरही या निमित्ताने प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. २५ एकरच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेला वडाळी बगिचा ‘बीओटी’ तत्त्वावर यवतमाळ येथील राजहंस टुरिझमला चालविण्याकरिता देण्यात आला आहे. बगिच्याच्या एकंदरीत व्यवस्थापनाची जबाबदारी राजहंस टुरिझमकडे आहे. शहरातील निसर्ग पर्यटन स्थळ म्हणून अमरावतीकरांचा ओढा वडाळी बगिच्याकडे वाढला आहे. येथे शहर व जिल्ह्यातून शैक्षणिक सहली सुद्धा येथे येतात.कुटुंबाला प्रवेश असे येथील प्रवेशद्वारावर लिहिले आहे. मात्र सर्रासपणे प्रेमीयुगूल आणि महाविद्यालयीन तरूणांना सशुल्क प्रवेश दिला जातो. हे युगुल बगिच्यात फिरण्याऐवजी प्रेमालापावर भर देतात. त्यावेळी सर्वसामान्य कुटुंब आणि फिरण्यास आलेल्या नागरिकांची कुचंबना होते. इतर सुविधा उपलब्ध प्रेमीयुगूल मात्र निसर्गरम्य झुडुपात आणि आडोसा हेरून सार्वजनिक स्थळांचा गैरवापर करतात.सार्वजनिक स्थळाचा गैरवापरअमरावती : दिल्ली येथील निर्भया हत्याकांडानंतर अमरावतीमध्येही वडाळी, छत्रीतलाव, शिवटेकडी येथील प्रेमालापावर मोठा अंकुश लावण्यात पोलिसांना यश आले होते. त्यावेळी शहराबाहेर जाणाऱ्या मार्गांवरही तपासणी मोहिमेचे सत्र चालविण्यात आले. तथापि मध्यंतरीच्या काळात बरेच पाणी वाहून गेल्याने परिस्थिती ‘जैसे थे’ बनली आहे. विशेष म्हणजे दीड-दोन वर्षांपूर्वी वडाळी बगिचा परिसरात महिला पोलिसांची ड्युटी लावण्यात आली होती. त्यावेळी अनेक प्रेमीयुगुलांवर प्रतिबंधात्मक कारवाईसुद्धा करण्यात आली. आज परिस्थिती ‘जैसे थे’ असून वडाळी बगिच्यात प्रेमीयुगुलांची गर्दी पाहायला मिळत आहे. या प्रेमीयुगुलांच्या ‘कर्तबगारी’मुळे अनेकदा महिला तथा ज्येष्ठांना मान खाली घालावी लागत असल्याचे सध्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)