शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी ‘लोकमत’चा पुढाकार

By admin | Updated: June 11, 2016 00:04 IST

बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाल्यांना आपल्या मुलांना कोणत्या क्षेत्रात प्रवेश देऊन करिअर घडवायचे, ही चिंता सतावत आहे.

श्रीकांत देशपांडे : ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’चा थाटात शुभारंभअमरावती : बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाल्यांना आपल्या मुलांना कोणत्या क्षेत्रात प्रवेश देऊन करिअर घडवायचे, ही चिंता सतावत आहे. मात्र, ‘लोकमत’च्या पुढाकाराने आयोजित शैक्षणिक प्रदर्शनात मुलांचे नक्कीच भवितव्य घडेल, असे प्रतिपादन अमरावती विभागाचे शिक्षक आ. श्रीकांत देशपांडे यांनी येथे शुक्रवारी व्यक्त केले.येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात लोकमत व सिपना कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’च्या शुभारंभाप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुलख पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव अजय देशमुख, सिपना कॉलेज आॅफ इंजिनीअरिंगचे प्राचार्य सिद्धार्थ लढके, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे सहप्रबधंक दिनेश सरावगी, प्रगती ब्रेन पावर इफ्रव्हमेंटचे डायरेक्टर अखिलेश बैतुले, के.जी.एस एज्युकेशन इंन्सिट्यूटचे प्रतीक अकर्ते, ‘लोकमत’चे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे, संपादकीय प्रमुख गणेश देशमुख उपस्थित होते. प्रदर्शनीचे उद्घाटन श्रद्धेय जवाहरलाल दर्डा यांचे दीपप्रज्ज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आले.आ. देशपांडे म्हणाले, 'लोकमत'चा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि चांगला आहे. एकाच ठिकाणी राज्यातील नामांकित शैक्षणिक संस्थांचे मार्गदर्शन मिळणार आहे. पाल्यांना मुलांचे भवितव्य घडवायचे असेल तर नक्कीच शैक्षणिक प्रदर्शनीला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी मार्गदर्शनातून केले.कुलसचिव अजय देशमुख यांनी 'लोकमत'च्या या उपक्रमाची भरभरून प्रशंसा केली. मी येथे पालक म्हणून आलो आहे. दहावी, बारावीचे निकाल जाहीर होताच दरवर्षी माता-पित्यांची प्रवेशासाठी टिकटिक सुरू होते. करिअर कोणत्या क्षेत्रात घडवायचे ही चिंता सतावत असताना 'लोकमत'ने शैक्षणिक प्रदर्शनीच्या माध्यमातून दालन उपलब्ध करून दिल्याचे अजय देशमुख म्हणाले. 'लोकमत'ने विद्यार्थ्यांसाठी सोल्युशन काढले असून ही समाज घडविण्याची तळमळ आहे. आज स्पर्धेच्या युगात कोणत्या क्षेत्रात करिअर घडवायचे, हे कन्फ्युजन दूर करून 'लोकमत'ने सोल्युशन काढले आहे. 'लोकमत'ने जगण्यासाठीच्या वाटा दाखविल्या असून या उपक्रमाला सलाम करूया. शैक्षणिक प्रदर्शनीला पाल्यांनी पालकांसह अवश्य भेट द्यावी, असे आवाहनही अजय देशमुख यांनी केले. संचालन लोकमतचे वितरण प्रबंधक रवि खांडे यांनी केले.