शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक व्याघ्रदिनी परतवाड्यात "शेरनी"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:13 IST

परतवाडा : जागतिक व्याघ्रदिनी परतवाड्यात "शेरनी" हा चित्रपट व्याघ्र प्रकल्पाकडून दाखविण्यात आला. शेरनी हा चित्रपट टी-वन वाघीण (अवनी) च्या ...

परतवाडा : जागतिक व्याघ्रदिनी परतवाड्यात "शेरनी" हा चित्रपट व्याघ्र प्रकल्पाकडून दाखविण्यात आला.

शेरनी हा चित्रपट टी-वन वाघीण (अवनी) च्या मृत्यू प्रकरणावर बनविला आहे. अवनीला यात वन्यजीव विभागाकडून ठार करण्यात आले होते. अवघ्या दोन वर्षात १३ माणसांना खाल्ल्याचा अवनीवर आरोप लावण्या आला होता. याचा शेवट तिला ठार करून झाला. यानंतर तिच्या छाव्यांना(बछड्यांना) बेशुद्ध करून रेस्क्यू सेंटरला पाठविले गेले.

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन्यजीव विभागांतर्गत या सत्य घटनेवर आधारित शेरनी हा चित्रपट आहे. यात मानव-वन्यजीव संघर्ष दाखविण्यात आला. मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांतर्गत मेळघाटमध्ये वाघांविषयी काही प्रमाणात असेच समज-गैरसमज बघायला मिळतात. यात पुनर्वसनाची समस्या मोठी आहे. वाघ सुरक्षित राहावा व वाघाला संरक्षण मिळावे, याकरिता मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अनेक परिणामकारक उपायोजना केल्या जात आहेत. मेळघाटमध्ये गुराढोरांच्या चराईचा प्रश्न नेहमीच उद्भवतो यात वन्यजीव अधिकारी व पशुपालकांमध्ये नेहमीच संघर्ष बघायला मिळतो.

याला अनुषंगून शेरनी या चित्रपटात एक डायलॉग पुढे येतो, "लोग अपने जानवरो को चराने कहा ले जायेंगे सर, जहा चाहे वाहा ले जाये," हमने ठेका थोडी ले रखा है. हमे तो टायगर की चिंता करनी चाहिये.

"आपके जंगल मे टायगर हमारे लिए खतरा बन चुका है, कोई हल है आपके पास, जब मुसीबत आपडी तो एक लेडी ऑफिसर को भेजा है"

शेरनी या चित्रपटात प्रमुख भूमिका एक्ट्रेस विद्या बालन ने निभावली आहे. ती एक आयएफएस ऑफिसरच्या भूमिकेत आहे. ती वाघिणीला संरक्षण व संवर्धन देण्याच्या भूमिकेत वावरते.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे एक नजर टाकली असता, या व्याघ्र प्रकल्पांतर्गत क्षेत्रसंचालक व मुख्य वनसंरक्षक म्हणून जयोती बॅनर्जी, तर मेळघाट वन्यजीव विभागाच्या डीएफओ म्हणून पीयुषा जगताप या आयएफएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यांच्यावरही मेळघाटातील वाघांच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी आहे. त्याही जबाबदारी प्रभावीपणे सांभाळत आहेत. जागतिक व्याघ्र दिन शेरनी चित्रपट बघितल्यानंतर अनेकांच्या पुढे व्याघ्र प्रकल्प अंतर्गत कार्यरत महिला अधिकाऱ्यांच्या प्रशंसनीय भूमिका येतात.

दि.29/7/21 फोटो