शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त वाहतुकीमुळे जीव धोक्यात

By admin | Updated: December 26, 2016 00:25 IST

शहरात वाहन चालविताना कोण अचानक पाठीमागून किंवा समोर येऊन धडक देईल, याचा नेम नाही.

७५ लाखांचा दंड वसूल : ४५ हजार वाहनचालकांवर कारवाई अमरावती : शहरात वाहन चालविताना कोण अचानक पाठीमागून किंवा समोर येऊन धडक देईल, याचा नेम नाही. कुणी लेनकट करतेय. कुणी एकेरी मार्गातून उलट दिशेने, तर नो एंट्रीचा फलक बघूनही वाहन दामटणारे, कुणी सिग्नल तोडून पुढे जाण्याच्या घाईत, तर काही झेब्रा क्रॉसिंगवरच थांबलेले.. तसेच दुचाकीवर मान वाकडी करून कानाला मोबाईल लावणारे वाहन चालक, रस्ता आपलाच आहे, कसेही जा, असे चित्र अमरावतीच्या रस्त्यावर सर्रास पाहायला मिळते. या बेशिस्त वागण्यामुळे अपघातात बळी जात आहेत. स्वत:सोबतच शिस्तीत जाणाऱ्या इतर वाहनचालकांच्या जीवालाही धोका निर्माण होत आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या कालावधीत शहर आयुक्तालयात ३०० हून अधिक छोटे मोठे अपघात झालेत. या अपघातामागे सर्वाधिक अपघात बेशिस्तपणे वाहन चालविल्यामुळे झाले आहेत. शहरात वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४५३४७ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यांच्याकडून ७४ लाख ५३ हजार ८५० रुपये दंड वसूल करण्यात आला. यात सिग्नल तोडण्यासह बेधडक वाहने चालविणे, विनापरवाना वाहन, लेन कटिंग, मोबाईल टॉकिंगसह रस्त्यावर एकेरी मार्गातून विरुद्ध दिशेने जाणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. ११ महिन्यांत ४५ हजार वाहन चालकांवरील कारवाई व त्यांचेकडून वसूल केलेला ७५ लाखांचा दंड वाहतुकीचा बट्ट्याबोळ दर्शविते. शहरातील रस्ते लहान आणि वाहनांची संख्या मोठी अशा विचित्र प्रमाणामुळे वाहतूक व्यवस्थेचे तीन-तेरा वाजतात, सकाळी प्रत्येकाला आॅफीस गाठायची तर विद्यार्थ्यांना शाळेत जायची घाई. सायंकाळी विशिष्ट वेळांमध्ये गर्दी वाढत असल्याने प्रत्येक जण जागा मिळेल तेथून आपले वाहन बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. अन् हळूहळू वाहतूक कोंडीत भर पडते. शहरातील रस्त्यांचा आधीच कोंडलेला श्वास नवी वाहने आणि अतिक्रमणाने आणखी व्यापला गेला आहे. (प्रतिनिधी)