शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

गुडेवारांना सीईओ करा, राणांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By admin | Updated: May 19, 2016 00:04 IST

महानगरपालिकेचे नुकतेच बदलून गेलेले लोकप्रिय आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारीपदी नियुक्त करण्यात यावे,

मागणी : जनतेला दिलासा द्याअमरावती : महानगरपालिकेचे नुकतेच बदलून गेलेले लोकप्रिय आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारीपदी नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र बडनेऱ्याचे आमदार रवि राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. गुडेवार यांनी वर्षभरात महापालिकेला आणि शहराला दखलनीय शिस्त लावली. सामान्यांचे महत्त्व महापालिकेत गुडेवारांच्या कारकिर्दीत वाढले होते. अमरावतीकरांची स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या महापालिकेत खऱ्या अर्थाने अमरावतीकरांचे राज्य निर्माण झाले होते. सामान्यजनांसाठी थेट आयुक्तांचे दालन कायमस्वरुपी उघडे होते. आयुक्तांचा मोबाईल क्रमांक नागरिकांकडे उपलब्ध होता. भ्रष्टाचार निखंदून काढणारे कर्तव्य बजावण्याला महत्त्व देणारे गुडेवार स्थानांतरित झाल्यानंतर अमरावतीकरांनी आंदोलन उभारले होते. व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवर आश्चर्यकारक जनसमर्थन गुडेवारांना लाभले होते. या तमाम मुद्यांचा आधार घेऊन आमदार रवि राणा यांनी गुडेवार यांच्या प्रशासन कौशल्याचे कौतुक केले आहे. अमरावती जिल्हा परिषदेत गुडेवारांसारखा अधिकारी आल्यास शिस्त लागेल. ग्रामीण जनतेला मोठा दिलासा मिळेल. निधीचा विनियोग पारदर्शकरित्या होईल. अमरावती जिल्हा परिषदेची ही गरज असून गुडेवार यांना तत्काळ प्रभावाने मुख्यकार्यपालन अधिकारी नेमावे, अशी प्रभावी मागणी राणा यांनी पत्रातून केली आहे.