हुंड्यासाठी जंगलात सोडले; गर्भवतीवर सामूहिक अत्याचार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 22:43 IST2017-08-18T22:43:44+5:302017-08-18T22:43:49+5:30

हुड्यांची मागणी करीत हात व डोळ्यावर पट्टी बांधून जंगलात सोडून देणा-या गर्भवतीवर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार २४ वर्षीय पीडितेने चांदूर रेल्वे पोलिसांत केली आहे.

Leave in the forest for Dundee; Mass torture on pregnancy | हुंड्यासाठी जंगलात सोडले; गर्भवतीवर सामूहिक अत्याचार 

हुंड्यासाठी जंगलात सोडले; गर्भवतीवर सामूहिक अत्याचार 

 चांदूर रेल्वे, दि. 18 -  हुड्यांची मागणी करीत हात व डोळ्यावर पट्टी बांधून जंगलात सोडून देणा-या गर्भवतीवर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार २४ वर्षीय पीडितेने चांदूर रेल्वे पोलिसांत केली आहे. याप्रकरणी हुंडा मागणा-या पतीसह सासू, सासरे, ननंदेसह चार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहे. 
पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, पीडितेच्या सासरची मंडळी जडी-बुटी विकण्याचा व्यवसाय करतात. पती भानूसिंग चितोडिया, सासू कश्मिरीबाई ऊर्फ लक्ष्मी चितोडिया, सासरे शेरसिंग चितोडिया व ननंद लाली चितोडिया २५ मार्च २०१७ रोजी एका जंगलातील अज्ञात स्थळी घेऊन गेले. जंगलात जाऊन तेथून त्यांनी पीडितेच्या माहेरच्या मंडळीना फोन लावून पैशांची मागणी केली. मात्र पैसे नसल्याचे उत्तर मिळाल्याने या ठिकाणी वाद झाला. 
पीडिता गर्भवती असताना भानूसिंग याने चाकूच्या धाकेवर मारहाण केली, त्यांनंतर तिच्या डोळयावर पट्टी व हात पाय बांधून तसेच सोडून दिले. दरम्यान तीन-चार अज्ञात व्यक्तींनी तिच्यावर अत्याचार केले. आपला जीव वाचवून पीडिता रायपूर (छ.ग.) येथे पोहचल्यावर काही नागरिकांच्या मदतीने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने एका मृत अभ्रकास जन्म दिला. या नंतर पीडितेने चांदूर रेल्वे पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपींवर भादंवि ३६५,३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती चांदूर रेल्वे पोलिसांनी दिली. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चैताली गवई करीत आहे.

आरोपी परराज्यातील असल्यामुळे त्यांचा ठावठिकाणी घेण्यात आला. त्यांना अटक करण्यासाठी परवाणगी आवश्यक आहे. याबाबत त्वरीत अटकेची कार्यवाही करण्यात येईल.
- ब्रह्मा शेळके
पोलीस निरीक्षक, चांदूर रेल्वे

Web Title: Leave in the forest for Dundee; Mass torture on pregnancy