शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटी वृक्ष लागवडीचे रोपटे मोजताहेत अखेरची घटका !

By admin | Updated: September 10, 2016 00:18 IST

राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून दोन कोटी वृक्ष लागवडीचा पल्ला गाठला असला तरी पावसाने अचानक महिनाभराची दडी मारल्याने हे रोपटे जगवावे कसे,...

सामाजिक वनीकरणाला चिंता : रोपटे जगविण्यासाठी उपाययोजना अमरावती : राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून दोन कोटी वृक्ष लागवडीचा पल्ला गाठला असला तरी पावसाने अचानक महिनाभराची दडी मारल्याने हे रोपटे जगवावे कसे, ही चिंता सामाजिक वनीकरणाला लागली आहे. परिणामी वृक्ष लागवड धोक्यात येण्याचे संकेत असून रोपटे शेवटची घटका मोजत आहे. अमरावती जिल्ह्यात दोन कोटी वृक्ष लागवडीत ४ लाख ८७ हजार वृक्षारोपण करण्यात आले आहे. आज, उद्या कधीतरी पाऊस येईल, या प्रतीक्षेत शेतकऱ्यांसह वनाधिकारी देखील आहेत. मात्र पावसाने महिन्याभरापासून दडी मारल्यामुळे वृक्ष लागवडीतील रोपट्यांना जगविणे हे फार अवघड झाले आहे. काही रोपटे सुकू लागल्याने वृक्ष लागवडीवर खर्च केलेले कोट्यवधी रुपये वाया तर जाणार नाही, ही चिंता सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना लागली आहे. राज्य शासनाने सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी यावर्षी जलसंधारण, जलयुक्त शिवार योजना राबविली. यंदा मोसमात प्रारंभी आलेल्या पावसाने मोठा दिलासा मिळाला. नदी, नाले, ओढे भरून वाहू लागले. यंदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असे गृहीत झाले. परंतु महिन्याभरापासून पाऊस अचानक दडी मारुन बसल्याने सततच्या दुष्काळामुळे पाण्याची पातळी खालावली आहे. अशातच राज्य शासनाने जंगलाचे क्षेत्र वाढविणे, पर्यावरण संंरक्षण, जंगलाचा होणारा ऱ्हास कमी करण्यासाठी १ जुलै रोजी दोन कोटी वृक्षलागवड हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविला. दोन कोटी पेक्षा जास्त वृक्ष लागवडीचा पल्ला गाठला. सदर वृक्ष लागवड होताच राज्यभरात पावसाचे दमदार आगमन झाले. त्यामुळे वृक्ष लागवडीतील रोपटे जगतीलच नाही तर ते हिरवेगार होऊन डौलाने उभे राहतील, असे भाकित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आदींनी वर्तविले होते. पंरतु गत महिन्याभरापासून पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला असला तरी सामाजिक वनीकरण विभागदेखील कोमात जाण्याच्या स्थितीत आहे. जून, जुलै या महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे रोपट्यांची चांगल्या पद्धतीने वाढ झाली. मात्र महिन्याभरापासून पावसाने उघडीप दिल्याने पाण्याअभावी रोपे सुकू लागली आहेत. डोंगरी भागात झालेल्या वृक्ष लागवडीतील रोपटे पाण्याअभावी सुकू लागली आहेत. डोंगरी भागातील रोपांना कसे जीवंत ठेवावे, हा गंभीर प्रश्न वनविभागासमोर उभा ठाकला आहे. रस्ता दुर्तफा वृक्ष लागवडीतील रोपे जगविण्यासाठी आॅक्टोंबरपासून निधीची तरतूद केली जाते. मात्र वृक्ष लागवड या महत्वकांक्षी प्रकल्पातील रोपटे जगविण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली नसल्याने ते पाण्याअभावी सुकू लागली आहेत.रोपवाटिकेतील रोपटे सुरक्षित आहेत. दोन कोटी वृक्ष लागवडीत जिल्ह्यात ४ लाख ८७ हजारांपैकी वनविभागाने १ लाख ५२ हजार एवढे वृक्षारोपण केले आहे. पावसाअभावी रोपटे जगविणे कठीण होत चालले असले तरी उपाययोजना केल्या जात आहेत.- प्रदीप मसराम,उपवनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, अमरावती.