शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वेतनाअभावी मजुरांची होळी अंधारात

By admin | Updated: March 9, 2017 00:26 IST

वर्षभर राबणाऱ्या मेळघाटातील आदिवासींना मग्रारोहयो अंतर्गत केलेल्या कामाचे वेतन होळी पूर्वी मिळण्याची शक्यता धुसर झाल्याने त्यांचा सर्वात मोठा सण अंदारात जाण्याची शक्यता आहे.

आदिवासी हतबल : चिखलदऱ्यात मग्रारोहयोचा ५० कोटी खर्च, नऊ कोटींचे वेतन प्रलंबितचिखलदरा : वर्षभर राबणाऱ्या मेळघाटातील आदिवासींना मग्रारोहयो अंतर्गत केलेल्या कामाचे वेतन होळी पूर्वी मिळण्याची शक्यता धुसर झाल्याने त्यांचा सर्वात मोठा सण अंदारात जाण्याची शक्यता आहे. तालुक्यात जवळपास ५० कोटी रुपयांचा खर्च या कामांवर करण्यात आला. त्यातील नऊ कोटी रुपयांचे वेतन मिळण्यासाठी आदिवासी प्रतीक्षेत आहेत. चिखलदरा तालुक्यात १ एप्रिल २०१६ ते ४ मार्च २०१७ पर्यंत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत विविध यंत्रनांनी केलेल्या कामांवर साधारणपणे ४९ कोटी ६० लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहे. या कामावर राबणाऱ्या आदिवासी मजुरांना बारा आठवड्यापासून वेतनच देण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती आहे. अंदाजे नऊ कोटी रुपयांचे वेतन रखडल्याने मेळघाटातील आदिवासी मजूर हतबल झाले आहे. त्यांचा होळी हा सर्वात मोठा सण असल्याने त्यापूर्वी त्यांना वेतन अदा करण्याची मागणी कांग्रेसचे तालुकाध्यक्ष मिश्रीलाल झाडखंडे, जि.प. सदस्या पूजा राहुल येवले, सरचिटणीस राहुल येवले, नानकराम ठाकरे, रामकली भुसूम सह आदि पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पोस्टाची लेटलतीफी मग्रारोहयो मजूरांचे वेतन गावातील पोस्ट कार्यालयात केल्या जाते. मात्र या पोस्ट आॅफीसमध्ये वेतन पोहचण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना आता नवीन सॉफ्टवेअरमुळे आदिवासींना अडचणी भेडसावत आहेत. २० गावांच्या मजूरांचे वेतन एकाच पोस्टआॅफीसमध्ये दिल्यावर समान नावे असणाऱ्या मजुरांची संख्या अधिक आहे. परिणामी वेतन देय कागदावर गावाचे नाव, कामाचे नाव, कामाचा कालावधी, ग्राम पंचायतचे नाव, मजूरांचे पूर्व नांव असा कुठल्याच प्रकारचे लिहिण्यात आले नाही. मजूरांचे व त्यांच्या वडीलांचे पहिले अक्षर व अडनाव एवढेच लिहून प्रत्येकी २० गावांच्या शेकडो मजुरांची प्रत्येकी यादी पाठविल्या जात आहे. त्यामुळे मजुरांची ओळ्ख पटविण्यासाठी व यादी छाननीसाठी चार ते पाच दिवसांपेक्षा अधिक कालावधी सुद्धा मजुरांना वेतनापासून वंचित ठेवणारा ठरला आहे. होळी सर्वात मोठा सण : आदिवासींचा सर्वात मोठा सण होळी असल्याने परिवारातील लहान-मोठ्या सह सर्वच सदस्यांसाठी नवीन परिधान व साहित्य खरीदी करतात. वर्षभर या होळी सणाची आतुरतेने वाट पाहतात. मेहनतीची कामे करुन पै-पै या सणासाठी जमा केली जाते.मेळघाटात रोजगार उपलब्ध नसल्यास हजारोंच्या संख्येने शहरीभागात स्थलांतरित होतात. एवढे असतांना नोटबंदीचा फटका सहन करीत आदिवासींना त्याच्या घामाचे दाम होळी सणापूर्वी मिळण्याची अपेक्षा प्रशासनाच्या ढिम्म कारवाईने धुसर असल्याचे चित्र आहे. (तालुका प्रतिनिधी) नियम धाब्यावर नरेगाच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांचे वेतन पंधरा दिवसात अदा करण्याचा नियम धाब्यावर बसवित मागील बारा आठवड्यापासून मेळघाटात वेतनच अदा करण्यात आले नाही. वीस गावांच्या जम्बो यादीत अनेक मुजरांची नावे गहाळ असल्याने आदिवासींना होळीपूर्वी त्याचे वेतन मिळणे दुरापास्त झाले आहे.२ कोटी प्रतिदिन जवळपास नऊ कोटी रुपयांचे आदिवासींचे वेतन शिल्लक आहे. परतवाडा येथील मुख्य डाकघरातून दर दिवशी दोन कोटी रुपये विविध गावातील पोस्ट कार्यालयात पाठविल्या जात आहे. मात्र तेथे गेल्यावर जम्बो यादिचा घोळ संतापजनक ठरला आहे. होळीपूर्वी आदिवासींना वेतन मिळावे, यासाठी प्रशासनातर्फे रात्रंदिवस कार्य सुरु आहे. खाजगी आणि शासकीय वाहनांची तशी व्यवस्था गावातील पोस्ट कार्यालयापर्यंत करण्यात आली आहे.जवळपास नऊ कोटी वेतन वाटप करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. - एन.टी. देसले बीडीओ चिखलदरा, पंस.