शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

‘खनिकर्म’ उत्पन्नात माघारले ६३ ऐवजी २७ कोटी वसूल : वाळू, खनिज संपदेची बेसुमार चोरी

By admin | Updated: March 23, 2015 23:53 IST

महसूल विभागात अतिशय महत्त्वाचा गणल्या जाणाऱ्या खनिकर्म विभागाचे उत्पन्न कमालीचे माघारले आहे.

गणेश वासनिक ल्ल अमरावतीअमरावती: महसूल विभागात अतिशय महत्त्वाचा गणल्या जाणाऱ्या खनिकर्म विभागाचे उत्पन्न कमालीचे माघारले आहे. यंदा २६ कोटी रुपयांच्या उत्पन्नाने खनिकर्म मागे असून ही बाब पालकमंत्र्यांनी गांभिर्यांने घेतली आहे. नेमके उत्पन्न घसरण्यामागील कारणमिमांसा शोधण्यासाठी पालकमंत्र्यांनी संशोधन सुरु केले आहे.राज्याचे सावजनिक बांधकाम, पर्यावरण, खनिकर्म राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या गृहजिल्ह्यातच खनिकर्म विभागाचे उत्पन्न माघारल्याने ही बाब ना. पोटे यांच्यासाठी अभ्यास करणारी आहे. गतवर्षी खनिकर्म विभाागचे उत्पन्न ४० कोटींच्या वर पोहचले होते. मात्र, यंदा अचानक उत्पन्नात घसरण कशी झाली? हा प्रकार सर्वांसाठीच धक्का देणारा आहे. खनिकर्म विभागात वाळू, खदान, क्रेशर, विटभट्टी, गौण खनिज दंडात्मक रक्कमेतून येणारी वसूली गृहीत राहते.२३५ वाळू घाटांचे लिलाव प्रस्ताव फेटाळलेखनिकर्म विभागाने ३६८ वाळू घाटांचे लिलाव करण्यासंदर्भात प्रस्ताव पर्यावरण विभागाला पाठविला होता. मात्र, पाण्याची पातळी, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास लक्षात घेता २३५ वाळू घाटांचे प्रस्ताव पर्यावरण विभागाने नामंजूर केले होते. १३३ वाळू घाटांचे प्रस्ताव मंजूर करीत ८१ वाळू घाटांच्या लिलाव करण्याला मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यापैकी ८६ वाळू घाटांचे लिलाव झाले असून १३ घाटांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.खनिकर्म विभागावर जेंव्हा लक्ष देण्याची वेळ आली तेंव्हा मार्च महिना आला. उत्पन्नात वाढ व्हायला हवी. उत्पन्न माघारले ही बाब गंभीर आहे. मध्यतंरी काही अधिकाऱ्यांनी यात बदमाशी केल्याची माहिती आहे. या प्रकरणी खोलात शिरुन गैरप्रकार बाहेर काढूच. चालू आर्थिक वर्षात नक्कीच खनिकर्मचे उत्पन्न वाढेल.-प्रवीण पोटे, खनिकर्म राज्यमंत्री