शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली

By admin | Updated: September 21, 2015 00:04 IST

अचलपूर-परतवाडा शहर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. रस्त्यावरील दुकानांचे अतिक्रमण कायम असून शासकीय जागेत कित्येकांनी भव्य इमारती उभारल्या आहेत.

अचलपुरात वाढते अतिक्रमण : प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिक त्रस्तसुनील देशपांडे अचलपूरअचलपूर-परतवाडा शहर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. रस्त्यावरील दुकानांचे अतिक्रमण कायम असून शासकीय जागेत कित्येकांनी भव्य इमारती उभारल्या आहेत. अतिक्रमित जागेची खरेदी-विक्रीही आपसात केली जात आहे. पालकमंत्र्यांनी अतिक्रमण हटविण्याचे आदेश देऊनसुद्धा नझूल विभाग, महसूल,बांधकाम विभाग व पालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे कार्यक्रमानिमित्त ज्या ज्या वेळी परतवाड्यात आले त्यावेळी त्यांचेसमोर जुळ्या शहरातील अतिक्रमणाचा विषय आला त्यांनीही बऱ्याच बैठका अतिक्रमण हटविण्याचे ठोसपणे सांगितले व संबंधित अधिकाऱ्यांना आदेशही दिले होते. गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वी शहरात झालेल्या एका कार्यक्रमात अतिक्रमण हटविण्याच्या सूचना दिल्या. प्रशासन या सूचना गांभिर्याने घेत असल्याने जनतेत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. जुळ्या शहरातील मुख्य रस्त्यांसह सर्वत्र अतिक्रमणाचा विळखा पडल्याने विकासाला खिळ बसली आहे. हे वाढते अतिक्रमण काढण्याचे अनेकदा प्रयत्न झाले कारवाईला सुरुवातही झाली. परंतु दुसऱ्याच दिवशी ती बंद पडली आता तर सुरूवातही झालेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या अतिक्रमण हटाव आदेशाला संबंधित अधिकारी जुमानत नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी जनतेची मागणी आहे.परतवाड्यात मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी पक्के बांधकाम केले आहे तर गुजरीबाजार लोटगाड्यांच्या विळख्यात आहे तर सदर बाजारातील काही दुकानदार दुकानातील माल रस्त्यापर्यंत आणून ठेवत आहे. त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना आपली वाहने रस्त्यातच उभी करावी लागतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून पादचाऱ्यालाही रस्त्यावरून चालणे कठीण होत आहे. शहर विकासाला अतिक्रमण फार मोठा अडसर आहे.