शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

कन्हान वाळू तस्करी फोफावली

By admin | Updated: March 27, 2017 00:08 IST

नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदी पात्रातून अमरावतीत मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी केली जात आहे. रॉयल्टी दोन ब्रास अन् १२ ब्रास वाळू वाहतुकीने कहर केला आहे.

कोट्यवधींचा महसूल बुडीत : रॉयल्टी दोन ब्रासची अन् वाहतूक १२ ब्रासअमरावती : नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदी पात्रातून अमरावतीत मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी केली जात आहे. रॉयल्टी दोन ब्रास अन् १२ ब्रास वाळू वाहतुकीने कहर केला आहे. या वाळू तस्करीतून शासन तिजोरीला फटका बसत आहे. यात पोलीस, महसूल व आरटीओंची मिलिभगत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.कन्हान नदी पात्रातून वाळू वाहतुकीचे प्रमुख केंद्र हे वलगाव मार्गावरील ट्रान्सपोर्टनगर तर नागपूर महामार्गवरील नवसारी स्टॉप हे आहे. वाळू वाहतुकीसाठी तस्कर रात्रीचा विशेष वापर करतात. दोन ब्रासची रॉयल्टी जमा करून १२ ब्रासपर्यत वाळू आणली जात आहे. त्यामुळे एका वाहनातून कन्हान वाळू तस्करीपोटी शासनाचा सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचा महसूल बुडत आहे. नियमबाह्य वाळू वाहतुकीला लगाम असताना दरदिवसाला ४० ते ५० ट्रक चालतात कसे? हा संशोधनाचा विषय आहे. कन्हान वाळू ही अमरावतीत सावनेर- खापा नदी पात्रातून आणली जात आहे. दोन ब्रास वाळूच्या रॉयल्टीचे ६५०० रुपये शुल्क दिले जाते. खरे तर १२ ब्रास वाळू वाहतुकीसाठी ३८ हजार ८२० रुपये इतकी रॉयल्टीपोटी शुल्क शासन तिजोरीत जमा करणे अपेक्षित आहे. मात्र अवघ्या ६५०० रुपयात १२ ब्रास वाळू आणून ती ४५ ते ५० हजार रुपयांत विकली जात आहे. कन्हान वाळू तस्करीचे पायमुळे खोलवर रुजली आहेत. वर्धा, नागपूर व अमरावतीचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यात सामील आहे. कन्हान वाळूची नियमबाह्य वाहतूक वजा तस्करी बिनदिक्कत सुरू राहावी, यासाठी आदिल व लाला हे दोन व्यक्ती आरटीओ, महसूल व पोलिसांना ‘मॅनेज’ करीत असल्याची माहिती आहे. अमरावती येथून दरदिवसाला ४० ते ५० ट्रक कन्हान नदी पात्रातून वाळू वाहतूक करतात. सावनेर, कळमेश्वर, कारंजा, तळेगाव, तिवसा, अमरावती व भातकुली असा तहसील हद्दीचा प्रवास करून कन्हान वाळूची शहरात तस्करी केली जाते. गत काही महिन्यांपासून कन्हान वाळू तस्करी, नियमबाह्य वाहतूक फोफावली आहे. शहराच्या विविध ठिकाणी कन्हान वाळू साठवून ठेवली जात असताना या अड्ड्यांवर कारवाई केव्हा करणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. कन्हान नदी पात्रातून नियमबाह्य वाळू येत असून लाखोंचा महसूल बुडत आहे. वाळू तस्करीतून दलाल, वाळू विक्रेते गब्बर झाले आहेत. हल्ली शहरात बांधकामासाठी सर्रासपणे कन्हान वाळू वापरली जात आहे. मात्र नियमबाह्य वाळू आणली जात असल्याने शासकीय वाळूची मागणी ओसरली आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात कन्हान वाळू वाहतूक रोकणे हे पोलीस, महसूल व आरटीओसमोर आव्हान ठरत आहे.रात्रीलाच वाळू वाहतूक का ?कन्हान नदी पात्रातून वाळू वाहतूक ही रात्रीलाच का केली जाते, यामागे बरेच काही दडले आहे. रात्री ९ ते सकाळी ६ वाजेदरम्यान सुसाट धावणारे १२ चाकांचे ट्रक दिवसा कोठे ठेवले जातात? हादेखील संशोधनाचा विषय आहे. कन्हान वाळूची विक्री करणारे ठराविक एजन्ट असून ते दिवस उजेडण्यापूर्वीच बांधकामस्थळी पोहोचून देतात. कन्हान वाळू तस्करीतून शासन तिजोरीत कोट्यवधीचा फटका बसत आहे. मात्र या व्यवसायातून काही जण गब्बर झाले आहे.