शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

‘एमओएच’साठी रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 6:00 AM

महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदासाठी नव्याने भरती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिल्यानंतर महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी विद्यमान एमओएच विशाल काळे यांच्या सेवा समाप्तीचे आदेश दिलेत. दरम्यान काळे हे रजेवर असल्याने त्यांना हे आदेश मिळालेले नाहीत, असे सांगण्यात आले.

ठळक मुद्देमहापालिका आयुक्त ठाम। विशाल काळे देणार सर्वोच्च न्यायालयात आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदासाठी विशिष्ट अधिकाऱ्यालाच प्रभार द्यावा, यासाठी महापालिकेतील भाजपपक्षाचे एक पदाधिकारी प्रयत्नशील आहे. मात्र, आयुक्त संजय निपाणे ठाम असल्याने त्यांची डाळ शिजलेली नाही. दरम्यान या पदासाठी प्रशासनाने जाहिरात दिलेली आहे. या सर्व प्रक्रियेत विद्यमान एमओएच डॉ. विशाल काळे यांचेद्वारा उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान व आयुक्तांच्या आदेशाला स्थगनादेश मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज करणार असल्याची माहिती आहे.महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदासाठी नव्याने भरती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिल्यानंतर महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी विद्यमान एमओएच विशाल काळे यांच्या सेवा समाप्तीचे आदेश दिलेत. दरम्यान काळे हे रजेवर असल्याने त्यांना हे आदेश मिळालेले नाहीत, असे सांगण्यात आले. आपली नियुक्ती ही सक्षम पॅनलने केली असल्याने यात गैर काहीही नाही व यामध्ये माझा कोणताही दोष नाही. त्यामुळे माझ्या हा अन्याय असल्याने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे, तसेच आयुक्तांच्या निर्णयालाही स्थगनादेश द्यावा, अशी मागणी करणार असल्याची माहिती, डॉ.विशाल काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.या सर्व प्रकरणांत पुन्हा ‘त्या’ अधिकाºयाला प्रभार द्यावा, यासाठी भाजपक्षाच्या महापालिकेच्या एक नेता व त्यांच्याच प्रभागातील स्वच्छता कंत्राटदार महापालिका प्रशासनावर दबाव आणत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. गतवर्षीच्या अनुभवानंतर आयुक्त याबाबत कुठलीही रिस्क घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे या महिण्यातच निवड प्रक्रियेत पात्र असणाºया अधिकाऱ्याच्या हाती आरोग्य विभागाची कमान दिली जाईल.प्रलंबित बिले हेच कारणविद्यमान एमओएचविशाल काळे यांनी काही कंत्राटदारांची बिले त्रुटीअभावी रोखून ठेवल्याने त्यांनी काही पदाधिकाऱ्यांच्या साहाय्याने आता प्रभारी एमओएच ठेवण्यासाठी दबावतंत्राचा वापर सुरु केलेला आहे. सर्व पेंडींग आॅलवेल करण्यासाठी या चौकडीला ‘त्या’ प्रभारी अधिकाऱ्यांची गरज असल्यानेच असा डाव खेळला जात आहे. हा सर्व प्रकार महापालिका आयुक्त संजय निपाणे यांच्या लक्षात आल्याने ते आता कुठलीही जोखीम पत्करण्यास तयार नसल्याची माहिती आहे.

टॅग्स :doctorडॉक्टर