शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
5
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
6
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
7
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
8
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
9
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
10
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
11
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
13
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
14
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
15
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
16
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
17
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
18
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
19
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
Daily Top 2Weekly Top 5

‘तिची’ दयनीय अवस्था पाहून न्यायाधीशही गहिवरले!

By admin | Updated: December 18, 2015 00:28 IST

येथील प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात कौटुंबिक हिंसाचाराप्रकरणी सुनावणी सुरू असताना या प्रकरणातील फिर्यादी महिला जळालेल्या अवस्थेत स्वत:च कोर्टात हजर झाली....

अग्निदग्धा पोहोचली न्यायालयात : उपचार सुविधा देण्याची मागणी धारणी : येथील प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात कौटुंबिक हिंसाचाराप्रकरणी सुनावणी सुरू असताना या प्रकरणातील फिर्यादी महिला जळालेल्या अवस्थेत स्वत:च कोर्टात हजर झाली आणि औषधोपचारासाठी पैसे मिळवून द्या, अशी केविलवाणी विनवणी तिने न्यायाधीशांकडे केली. हा प्रकार पाहून न्यायाधीशही गहिवरले. तालुक्यातील धारणमहू येथील रहिवासी व मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील सासर असलेली विवाहिता कविता ऊर्फ अन्नू मथुराप्रसाद पटोरकर (२२) मागील वर्षी होळीच्या दिवशी सासरच्या मंडळींनी पेटविले होते. या घटनेत ती ८० टक्के भाजली होती. हे कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकरण धारणीच्या प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात सुरू आहे. बुधवारी या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू होती. सध्या ही पीडित महिला तिच्या आई-वडिलांकडे म्हणजे धारणमहू येथे राहून उपचार घेत आहे. परंतु आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने तिच्या माहेरची मंडळी मोठी कसरत करून तिच्यावर उपचार करीत आहेत. अशा स्थितीत उपचाराचा खर्च त्यांना पेलविणारा नाही. ही परवड असह्य झाल्याने बुधवारी कोर्टात सुनावणी सुरू असताना कविता थेट न्यायाधिशांसमोर उपस्थित झाली आणि तिने ‘साहेब मला न्याय द्या’, असा टाहो फोडला. ८० टक्के भाजलेली अग्निदग्धा न्यायालयासमक्ष येऊन न्याय मागत असल्याने न्यायमूर्ती संतोष कुर्वे हेदेखील काहीसे गहिवरले. त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना व संरक्षण अधिकारी आसोले यांना महिलेची विशेष काळजी घेऊन तिच्यावर उपचार करण्याचे निर्देश दिलेत. ८० टक्के भाजलेल्या कविताच्यावतीवे तिची लहान बहीण सुरेखा वासुदेव कस्तुरे हिने न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकरण दाखल केले आहे. न्यायालयाने या प्रकरणात ३१ मार्च २०१५ रोजी अंतरिम खावटी खर्च म्हणून कविताला ५ हजार रूपये द्यावेत, असे आदेश कविताचा पती मथुराप्रसाद रामाधार पटोरकर, जाऊ गीता इसुनाथ पटोरकर, भावसासरा गोपीनाथ पटोरकर, राधा गोपीनाथ पटोरकर यांना दिले होते. दरम्यानच्या काळात कविताच्या पतीला मध्यप्रदेश पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली शिक्षा सुनावली होती. तुरूंगातून सुटून आल्यानंतर त्याने न्यायालयात दाखल प्रकरणात मंजूर झालेला खावटीचा अर्ज रद्द करून प्रकरण नव्याने चालविण्याबाबत अर्ज केला होता. मात्र, आपल्या गरीब आई-वडिलांकडे राहून उपचार घेणे शक्य नसल्याने कविता स्वत:च भाजलेल्या अवस्थेत न्यायालयात हजर झाली आणि तिने न्यायाची मागणी केली. हा प्रकार पाहून उपस्थितांचे काळीज हेलावले. (तालुका प्रतिनिधी)