शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंग राठोड हाजीर हो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:27 IST

अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ३.३९ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल झालेले बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी ...

अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ३.३९ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल झालेले बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जयसिंग राठोड यांना सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने समन्स बजावले आहेत. त्यांना ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ईडीच्या मुंबई स्थित कार्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे. बँकेची सार्वत्रिक निवडणूक घोषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर ईडीच्या समन्समुळे सहकारक्षेषेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

इडीच्या मुंबई स्थित कार्यालयाचे सहायक निदेशक अमिताभ मलिक यांच्या स्वाक्षरीचा हा समन्स २८ ऑगस्ट रोजी बजावण्यात आला आहे. राठोड यांनी स्वत: उपस्थित राहावे किंवा त्यांचा अधिकृत प्रतिनिधीदेखील चालेल, असेही समन्समध्ये नमूद आहे. ईडीच्या समन्समुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

जिल्हा बँकेने सन २०१७ ते २०२० दरम्यान एका खासगी कंपनीत ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्या व्यवहारापोटी देण्यात आलेल्या ३.३९ कोटी रुपयांच्या दलालीमुळे बँकेची फसवणूक झाली, अशी तक्रार प्रशासकाने १५ जून रोजी शहर कोतवाली पोलिसांत नोंदविली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी जयसिंग राठोड यांच्यासह पाच अधिकारी-कर्मचारी, संबंधित कंपनीचा स्थानिक व्यवस्थापक व ब्रोकर्स अशा एकूण ११ जणांविरुद्ध फसवणूक, गुन्हेगारी स्वरूपाचा कट आदी गुन्हे दाखल करण्यात आले होते. सध्या या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

बॉक्स

ईडीने मागविली होती माहिती

यापुर्वी याप्रकरणाची संपूर्ण माहिती ईडीने जिल्हा उपनिबंधकांकडून मागवून घेतली होती. तत्कालीन जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी स्वत: हजर राहून लेखापरीक्षण अहवालासह संपूर्ण दस्तावेज ईडीच्या मुंबई कार्यालयाकडे सोपविला होता.

////////

राठोडांकडून नो आन्सर

याबाबत जयसिंग राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.