शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
2
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
3
चार कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्रात राहता येणार नाही; व्हायरल पोस्टनंतर सरकारने सांगितलं सत्य 
4
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
5
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
6
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
7
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
8
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
9
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
10
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
11
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
12
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
13
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
14
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
15
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
16
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
17
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
18
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
19
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
20
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
Daily Top 2Weekly Top 5

'जे अ‍ॅन्ड डी' मॉलधारक, महापालिकेत ‘तडजोड’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2016 00:04 IST

तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी 'जे अ‍ॅन्ड डी मॉल'च्या विकसकाला पाठविलेली ५४ लाख ५४ हजारांच्या नोटीसला आव्हान मिळल्याने...

चार लाखांची नोटीस : आयुक्त सकारात्मक
अमरावती : तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी 'जे अ‍ॅन्ड डी मॉल'च्या विकसकाला पाठविलेली ५४ लाख ५४ हजारांच्या नोटीसला आव्हान मिळल्याने विद्यमान यंत्रणने या विकसकाला ४ लाखांची नोटीस पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. गुडेवारांनी बोलविलेल्या नोटीस विरोधात नगरविकास विभागाकडे दाद मागितली होती. त्यावर नगरविकास राज्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. त्यावर शासन जो काही निर्णय देईल, त्याला अधीन राहून ५४ लाखांऐवजी सुमारे ४ लाख २० रुपयांची नोटीस पाठविण्यात यावी, यावर यंत्रणेकडून शिक्कामोर्तब झाले आहे.
१ जानेवारी २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत भाडे रक्कम आपण भरल्यास तयार आहोत, असे पत्र एस.नवीन बिल्डर्स या विकसकांनी महापालिकेत दिले. मागील आठवड्यात दिलेल्या या पत्यावर विद्यमान आयुक्तांनी नियमित भाडे रकमेचा भरणा करून घेण्याला हिरवी झेंडी दिली. राज्य शासनाने ५४ लाख ५४ हजार रुपयांची नोटीस वैध ठरविल्यास ती रक्कम भरावी लागेल. तो निर्णय बंधनकारक राहील, अशा अटी शर्तींवर 'जे अ‍ॅन्ड डी मॉल'च्या विकसकाला आर्थिक दिलासा मिळाला आहे. १ जानेवारी २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीसाठी या विकसकाकडून महापालिकेला १२ लाख रुपये द्यायचे आहे.
यातील ८ लाख रुपये आधीच भरणा केल्याने ५४ लाखांच्या ऐवजी एस. नवीन बिल्डर्स यांना आता केवळ ४ लाख रुपये भरायचे आहेत. (प्रतिनिधी)

मनपाचे आर्थिक नुकसान
विकसकाने मुदतीच आत बांधकाम पूर्ण केले नाही व करारापेक्षा अधिक जागा वापरुन गाळेधारकांना कमी क्षेत्रफळाचे गाळे देण्यात आले. तसेच वेळोवेळी नकाशामध्ये बदल केल्याने न्यालयात प्रकरण दाखल झाले. त्यामुळे भाडेपोटी मिळणारी रक्कम न मिळाल्याने मनपोच आर्थिक नुकसान झाले. या पार्श्वभूमिवर तत्कालीन आयुक्त डोंगरे यांनी भाडे रकमेत विकसकाला दिलेली सूट चंद्रकांत गुडेवार यांनी रद्द केली होती व त्यानंतर ५४.५४ लाख रुपयांची नोटिस पाठविण्यात आली होती.

२१ एप्रिलचा आदेश
जे अ‍ॅन्ड डी मॉल संकुलामधील दुकानाची थकीत भाड्याची रकमेचा त्वरित भरणा करण्याबाबत महापालिका आयुक्तांकडून एस.नवीन बिल्डर्सला २१ एप्रिल २०१६ ला नोटीस देण्यात आली. यात ५४ लाख ५४ हजार ५१२ रुपये पत्र मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत बाजार व परवाना विभागात जमा करावी, अशी सूचना करण्यात आली होती.

गुडेवारांकडून सूट रद्द
जे अ‍ॅन्ड डी मॉलच्या एस.नवीन बिल्डर्स (जेव्ही) यांना ४ जुलै २०१२ ते ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत दिलेली सूट तत्कालीन आयुक्तांनी रद्द केली होती व त्याअनुषंगाने करारनाम्यानुसार सन २०११-१२ ते मार्च २०१६ पावेतोचे कालावधीची भाडेपोटीची रक्कम ५४,५४,५१२ रुपये काढण्यात आली होती. गुडेवारांच्या या कारवाई विरोधात एस. नवीन बिल्डर्स यांनी शासनाकडे दाद मागितली आहे.

१ जानेवारी १५ ते मार्च १६ या कालावधीत रक्कम भरण्यास तयार असल्याचे पत्र विकसकाकडून मिळाले. त्यानंतर शासन निकालाच्या अधीन राहून सुमारे ४ लाख रुपयांच्या भाड्यासाठी नोटिस पाठविण्यात येत आहे.
- राजेंद्र दिघडे,
अधीक्षक, बाजार व परवाना विभाग

तत्कालीन आयुक्तांनी चुकीचे मार्किंग केले होते. त्यांच्या निर्णयावर नगर विकास विभागाने स्थगिती दिली आहे. नियमित भाडे भरल्यास तयार असल्याचे पत्र महापालिकेला दिले आहे.
- नवीन चोरिडया,
विकसक, मे. एस. नवीन बिल्डर्स

तत्कालीन आयुक्तांच्या नोटीसला नगरविकास राज्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. त्यामुळे त्या आधीच्या आयुक्तांचा आदेश वैध ठरतात. नगर विकास विभागाच्या निर्णयाच्या अधीन राहून थकीत रकमेच्या भरणा करण्यासाठी नोटीस पाठविली जाईल.
- हेमंत पवार, आयुक्त,महापालिका