शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
3
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
4
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
5
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
6
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
7
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
8
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
10
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
11
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
12
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
13
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
14
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
15
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
16
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
17
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
18
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
19
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
20
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
Daily Top 2Weekly Top 5

व्हिनस प्लाझा येथील हॉटेलच्या सांडपाण्यामुळे जगणे असह्य

By admin | Updated: September 23, 2015 00:22 IST

स्थानिक शेगाव नाका चौकातील व्हिनस प्लाझा संकुलातील एका हॉटेलमधून निघणाऱ्या सांडपाण्याने दुकानदारांना मरणयातना सहन कराव्या लागत आहे.

दुकानदारांची पोलिसात तक्रार : महापालिका आयुक्तांना निवेदन सादरअमरावती : स्थानिक शेगाव नाका चौकातील व्हिनस प्लाझा संकुलातील एका हॉटेलमधून निघणाऱ्या सांडपाण्याने दुकानदारांना मरणयातना सहन कराव्या लागत आहे. कुजलेले अन्न, सांडपाणी, डांसाचा प्रादुर्भावामुळे डेंग्यूसारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या हॉटेल चालकाविरुद्ध पोलिसात तक्रार तर महापालिका आयुक्तांना निवेदन सादर करुन मरणयातनेतून बाहेर काढण्याची मागणी करण्यात आली आहे.८० गाळे असलेल्या या संकुलात हॉटेलमधून निघणाऱ्या सांडपाणी, टाकाऊ पदार्थ, कुजलेला भाजीपाला, तेलाचे आवरण अशा विविध बाबींमुळे संकुलातील किमान ५० गाळेधारक त्रस्त झाले आहेत. सतत पसरणाऱ्या दुर्गंधीने दुकानदाराचे आरोग्य धोक्यात आले आहे. वेगळा दर्प सतत या संकुलात राहात असल्यामुळे ग्राहक देखील या संकुलात येण्याचे टाळतात, असे तक्रारकर्त्या दुकानदारांचे म्हणणे आहे. या संकुलातून निघणाऱ्या सांडपाण्याचा गाळ साचल्याने मुख्य नाली अवरुद्ध झाली आहे. अशातच पावसाचे पाणी साचून राहिल्याने डासांचे थवे घोंगावणे ही नित्याचीच बाब झाली आहे. अनेकदा पंपाद्वारे पाणी बाहेर काढण्याचा प्रसंग दुकानदारांवर ओढवत आहे. या संकुलातील दुकानदार नियमित मालमत्ता करधारक असून महापालिकेत तक्रार दिल्यानंतरही या हॉटेल संचालकाविरुद्ध कारवाई होत नसल्याचा आरोप दुकानदारांनी केला आहे. या संकुलातील पार्किंग व्यवस्थेचा पूरता बोजवारा उडाला आहे. नालीतून सांडपाणी बाहेर पडत नसल्याने ही परिस्थिती येत्या काळात गंभीर होण्याची शक्यता असल्याचे दुकानदारांनी तक्रारीत नमूद केले आहे. विलास राऊत, विलास विरूळकर, अतुल होले, मनोज जेठानी, देवीलाल शर्मा, प्रशांत चौधरी, आर. व्ही. मिरगे, आशिष गायकवाड, संजय इंगोले, संतोष काळे, जगदीश डोंगरे, प्रवीण काळे, सागर फणसे, राकेश फणसे, एस. ए. विंचुरकर, विजय लोखंडे या दुकानदारांनी हॉटेल संचालकाविरुद्ध धाव घेतली आहे. संकुल परिसरात आरोग्यविषयक गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदनातून म्हटले आहे. (प्रतिनिधी)