शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विमानतळाचा मुद्दा उपमुख्यमंत्र्यांच्या पुढ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:30 IST

बडनेरा : दहा वर्षांपासून रेंगाळत असलेल्या बेलोरा विमानतळाच्या कामकाजाला गती देण्यासाठी निधीचा मुद्दा कायम पुढे आला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री ...

बडनेरा : दहा वर्षांपासून रेंगाळत असलेल्या बेलोरा विमानतळाच्या कामकाजाला गती देण्यासाठी निधीचा मुद्दा कायम पुढे आला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अवगत केले आहे. वित्तमंत्री असलेल्या उपमुख्यमंत्र्यांनी मागणीबाबत सकारात्मकता दर्शवली असून, विमानतळाच्या कामाला गती मिळेल, असा विश्वास पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

बेलोरा विमानतळ परिसरातील संरक्षण भिंत उभारण्याचे काम अर्धवट आहे. टर्मिनस बिल्डिंग तसेच रनवेचेदेखील काही काम अपूर्ण आहे. काही कामांसाठी निधीची आवश्यकता आहे. निधी उपलब्ध झाल्यास कामाला गती मिळून अमरावतीकरांना दळणवळणासाठी जलद साधन उपलब्ध होईल. याबाबत ‘लोकमत’ने २ फेब्रुवारी रोजी ‘विमानतळाहून उड्डाण केव्हा?’ या शीर्षकाने वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेत पालकमंत्री ठाकूर यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके उपस्थित होते.

अमरावती जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने विमानतळ लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. जिल्ह्यासाठी यापूर्वीच विमानतळ मंजूर असून, या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने विमानतळाचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे या कामाला गती मिळण्यासाठी अंदाजपत्रक २०२१-२२ मध्ये पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकमंत्री ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना केली. त्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील वस्त्रोद्योग पार्क व त्यानुषंगाने औद्योगिक विकासाच्या मोठ्या शक्यता पाहता विमानतळ लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. येथील उद्योगवाढीसाठीही पालकमंत्र्यांकडून वेळोवेळी पाठपुरावा होत असून, ‘मेक इन महाराष्ट्र’ अंतर्गत नवे उद्योगही उभारले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर विमानतळाची आवश्यकता आहे. तेथील कामे लवकरच गती घेतील, असा विश्वास पालकमंत्री ठाकूर यांनी व्यक्त केला.