शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

इर्विनमध्ये महिन्याकाठी २00 ऑक्सिजन सिलिंडर

By admin | Updated: June 9, 2014 23:22 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना महिन्याकाठी २00 ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता भासते. याकरिता प्रशासनाकडून वर्षाकाठी ४५ हजारांचा खर्च केला जातो. परंतु रूग्णालयातील ढेपाळलेल्या

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना  महिन्याकाठी   २00 ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता भासते. याकरिता  प्रशासनाकडून वर्षाकाठी ४५ हजारांचा खर्च केला जातो. परंतु रूग्णालयातील ढेपाळलेल्या सेवेमुळे गरजू रूग्णांपर्यंत ही सेवा पोहचत नसल्याची ओरड आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात दरदिवसाला ४00 ते ५00 रुग्ण उपचाराकरिता येतात. त्यापैकी १00 च्या जवळपास रुग्णांना दाखल करून घेतले जाते. जानेवारी ते मे २0१४ पर्यंत १५ हजार रुग्ण उपचाराकरिता रुग्णालयात दाखल होते. त्यापैकी १३ हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. रुग्णांच्या वाढत्या ओघाच्या  रुग्णांना दिल्या जाणार्‍या सोई अपुर्‍या पडत आहेत. काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे विविध रोगांनी बाधित रुग्णांची संख्यादेखील वाढली आहे. अपघातांचे प्रमाणही वाढत चालले असून दररोज अनेक अपघातग्रस्त इर्विनमध्ये उपचारासाठी दाखल होतात. अपघातग्रस्त रूग्णांपैकी काही अत्यवस्थ रूग्णांना ऑक्सिजनची गरज भासते. त्यासाठी दर महिन्याला ऑक्सिजनचे २00 सिलिंडर लागतात. आयसीयू, ओपीडी व सर्व वॉर्डांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्याकरिता पाईपलाईन टाकण्यात आली आहे. प्रत्येक रुग्णाच्या बिछान्याजवळ ऑक्सिजनची जोडणी देण्यात आल्याने अतिदक्षतेची गरज असणार्‍या रुग्णांना लगेच ऑक्सिजनचा पुरवठा करता येतो.  दररोज शेकडो रुग्णांना  ऑक्सिजनची गरज भासते. १ क्युबिक एमएमचे ऑक्सिजन सिलिंडर १३0 रुपये, १.५ क्युबिक एमएमचे १४0 रूपये तर ७ क्युबिक एमएमचे सिलिंडर ३६0 रुपयांत विकत घेतले जाते. वर्षभरात ४५ हजारांचा खर्च जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला ऑक्सिजनसाठी करावा लागत आहे. परंतु रूग्णालय व्यवस्थापनच ढेपाळल्याने रूग्णांचे हाल होतात.  (प्रतिनिधी)